नायगाव विधानसभेचे लोकप्रिय नेते तथा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विद्यमान अध्यक्ष वसंतराव पाटील चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त दि.१५ आॅगस्ट रोजी नायगाव येथे ह.भ.प.श्री सोपान महाराज सानप यांच्या भव्य किर्तन सोहळ्याचे व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी सदर किर्तनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन मा.आ.वसंतराव पा.चव्हाण मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. दि १५ ऑगस्ट २०२२ रोजी कॉंग्रेस पक्षाचे नेते तथा माजी आमदार वसंतराव पाटील चव्हाण यांचा वाढदिवस असल्याने वाढदिवसाचे औचित्य साधून मित्र मंडळाच्या वतीने महाराष्ट्राचे प्रसिद्ध किर्तनकार ह.भ.प.श्री.सोपान महाराज सानप यांच्या भव्य किर्तन सोहळ्याचे व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
नायगाव शहरातील नांदेड रोडवर असलेल्या जयराज पॅलेस मंगल कार्यालय येथे सकाळी १०:३० वाजता सदर किर्तन सोहळा पार पडणार असून नायगाव विधानसभेतील जनतेनी याचा लाभ घ्यावा व आपल्या लाडक्या नेत्याच्या अभिष्टचिंतन सोहळ्यास सहभागी व्हावे असे आवाहन माजी आमदार वसंतराव पाटील चव्हाण मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. If you continue to use this site we will assume that you are happy with it.AcceptPrivacy policy