वसंतराव चव्हाण यांना विजयी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या गावोगावी भेटी !

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
         नांदेड लोकसभा निवडणुकीचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार वसंतराव चव्हाण यांच्या प्रचारार्थ बिलोली राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने बिलोली तालुक्यातील सर्व गावातील मतदारांच्या भेटी घेऊन वसंतराव चव्हाण यांना विजयी करण्याचे आवाहन तालुकाध्यक्ष सुभाष गायकवाड हे करताना दिसून येत आहेत.
             बिलोली राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार वसंत बळवंतराव चव्हाण यांच्या प्रचारार्थ गेल्या दहा दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष सुभाष गायकवाड यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी तालुक्यातील सर्व गावातील मतदारांच्या भेटी व कॉर्नर बैठका घेऊन वसंतराव चव्हाण यांना विजयी करण्याचे अवाहान करत असल्याचे दिसून येत आहेत. या भेटीदरम्यान त्यांना अनेक मतदारांनी चांगल्या प्रतिसाद देत असल्याचे ही पाहायला मिळत आहे.
            या प्रचारा मध्ये तालुकाध्यक्ष सुभाष गायकवाड, बाबुराव पाटील खेडे, काँग्रेसचे माजी उपाध्यक्ष अशोक कांबळे, माजी उपाध्यक्ष सलीम शेठ, बिलोली शहराध्यक्ष आनंद गुडमलवार, कुंडलवाडी शहराध्यक्ष अमरनाथ कांबळे, सादिक पटेल, बाबुराव टोपे, राजू सोनकांबळे, बाबुराव सोनकांबळे, आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभागी झाले होते.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या