मा.आ.वसंतराव चव्हाण यांचा घुंगराळा च्या नागरिकांकडून सत्कार !

[ प्रतिनिधी – दीपक गजभारे घुंगराळेकर ]
नायगांव नगरपंचायत निवडणुकीत मा.आमदार तथा नायगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय लाडकं नेतृत्व तथा नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मा.श्री.वसंतराव पाटील चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाचे सर्वच्या सर्व 17 उमेदवार हे प्रचंड मताधिक्याने विजयी झाल्या.
यानिमित्त त्यांचा सत्कार घुंगराळा येथील नागरिकांकडून करण्यात आला. यावेळी श्री.साहेबराव माली पाटील सुगावे, श्री.बापुराव पाटील सुगावे, सरपंच प्रतिनिधी श्री.मोहनराव जोगेवार, घुंगराळा नगरीचे युवा नेतृत्व श्री.पंडीत पाटील सुगावे, माजी सरपंच श्री.मालोजीराव यमलवाड, मा.ग्रा.पं.सदस्य श्री.बालाजी तुरटवाड, नायगाव विधानसभा युवक काँग्रेसचे सरचिटणीस श्री.देविदास पाटील सुगावे, काँग्रेस सोशल मिडीया तालुका उपाध्यक्ष श्री.लक्ष्मन कासराळे व माधवराव कंचलवाड आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी मा.जि.प.सदस्य श्री.माधवअप्पा बेळगे, कृ.उ.बा.स. नायगावचे उपसभापती श्री.धुप्पेकर साहेब व कोलंबी येथील श्री.दादाराव पाटील शिंदे यांची सुद्धा उपस्थिती होती.

*वाचत रहा मास महाराष्ट्र न्युज* www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या