शेतकऱ्यांचे विज कनेक्शन तोडू नका – मा.आ.वसंतराव चव्हाण यांची मागणी

[ नायगांव बा.तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]

सध्या महावितरण कंपनीकडून शेतकऱ्यांच्या विज बिल वसूलीच्या नांवावर हजारो शेतकऱ्यांचे कनेक्शन तोडण्याचा सपाटा लावला असून. महावितरण कंपनीची हि हेखेखोरी चालू देणार नाही. वेळ पडल्यास गावा-गावातील शेतकऱ्यांना एकजूट करू रस्यांवर ऊतरावे लागेल असा इशारा माजी आ.वसंतराव चव्हाण यांनी महावितरण कंपनीला अवाहानात्मक इशाराच दिला आहे.

एकीकडे महाराष्ट्र शासनाचे प्रमुख, मुख्यमंत्री, मा.ना.श्री एकनाथराव शिंदे साहेब, म्हणतात शेतकऱ्यांचे लाखो एकर जमिन सिंचनाखाली आनणार व उपमुख्यमंत्री, मा.ना.श्री देवेंद्र फडणवीस साहेब म्हणतात शेतकऱ्यांच्या विज-जोडण्या कापूनये असे निर्देश संबधीत विद्युत कंपनीच्या अधिकारी वर्गांना दिले आहेत. असे असूनही महावितरण कंपनीचे अधिकाऱ्यांची दादागीरी शेतकरी खपवून घेणार नाहीत. राज्याच्या प्रमुखांनी दिलेले आदेश न-पाळता विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी, कर्मचारी मुजोरपणे वागत असून. गावो-गावी जावून विज-जोडणी तोडत आहेत. खरीप हंगाम अतिवृष्टीमुळे गेला आणि रब्बी हंगाम, शेतकऱ्यांकडे पाणी उपलब्ध असतांना सूध्दा विद्यूत वितरण कंपनीच्या विज कनेक्शन तोडणीमुळे आर्थीक नूकसान होणार असल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे.

परीणामी शेतकऱ्यांचा उद्रेंक होऊन रस्त्यांवर ऊतरून कायदा हातात घेण्या अगोदर विद्यूत- तोडण्या त्वरीत थांबवाव्यात अशी मागणी करीत आहे.

Www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या