माझ्या आई-वडिलांनी माझ्यावर चांगले संस्कार केले म्हणून मी आज घडलो म्हणूनच त्यांची उतराई म्हणून माझ्या वडिलांचे पुण्यस्मरण व माझा वाढदिवस एकाच वेळी येत असल्याने गेली बारा वर्षे मी मराठवाड्यातील प्रसिद्ध कीर्तनकार यांच्या उपस्थितीत अखंड हरिनाम सप्ताह सोहळा घेत होतो परंतु कोरोणाच्या काळात तो खंड पडला म्हणून माझ्या मनात रुख रूख होती. आज माझ्या वाढदिवसानिमित्ताने मी एक दिवस साधुसंताचा आशीर्वाद घ्यावा या उद्देशाने ह भ प सोपान महाराज सानप यांचा कीर्तन सोहळा ठेवला त्यामुळे जनतेने व महाराजांनी माझ्यावर असाच आशीर्वाद ठेवून पुढील आयुष्य चांगलं व्हावं हीच प्रार्थना ईश्वरा जवळ करतो असे असे विचार वाढदिवसानिमित्ताने जमलेल्या जनसमुदायासमोर माजी आमदार वसंतराव चव्हाण मत व्यक्त केले.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने व माजी आमदार तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष वसंतरावजी चव्हाण यांच्या हस्ते विविध ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले. माजी आमदार वसंतराव चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्ताने नगरपंचायतीच्या वतीने बांधण्यात येणाऱ्या नूतन इमारतीचे उद्घाटन उपस्थित लाईटचे उद्घाटन सोहळा प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आला.
उद्घाटनानंतर माजी आमदार वसंतराव चव्हाण यांचे उघड्या जीपमधून नगरपंचायत पासून नायगावच्या मुख्य रस्त्यावरून जयराज पॅलेस पर्यंत जाते वेळेस माजी आमदार यांचे जागी जागी नागरिकांच्या वतीने सत्कार करण्यात आले, हजारो कार्यकर्त्यांनी सायकल रॅलीमध्ये सहभागी झाले होते जयराज पॅलेस येथे प्रसिद्ध कीर्तनकार ह भ प सोपान महाराज बिडकर यांचे कीर्तन झाल्यानंतर महाराजांच्या हस्ते माजी आमदार वसंतराव चव्हाण यांचा सह पत्नीक तसेच नगरपंचायतीच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी नायगाव नगरपंचायत , आर्य वैश्य समाज बांधव, नायगाव संघातील नायगाव धर्माबाद उमरी तालुक्यातील सर्व काँग्रेसचे पदाधिकारी अध्यक्ष कार्यकर्ते विविध गावातील सरपंच चेअरमन शुभेच्छा देण्यासाठी विधान परिषदेचे सदस्य अमर भाऊ राजुरकर, आमदार मोहनराव हंबर्डे, आमदार जितेश अंतापुरकर, आनंदरावपाटील चव्हाण , कैलास गोरठेकर,जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर मीनलताई खतगावकर जिल्हा परिषद चे अध्यक्ष मंगाराणी अबूलगेकर,तालुका काँग्रेसचे अध्यक्ष संभाजी पाटील भिलवंडे,माधवराव बेळगे , केशवराव पा चव्हाण,मोहनराव पा धुपेकर माधवराव पा जाधव, हनमंतराव पाटील चव्हाण, सभापती संजय बेळगे, गंगाधरराव शिकारे, बालाजीराव मदेवाड,संजय पा शेळगावकर , मनोहर पवार, मनोज पा टाकळीकर, श्रीनिवास पाटील चव्हाण, सय्यद रहीम शेठ , बालाजीराव मदेवाड, नगराध्यक्ष विजय पा चव्हाण, प्राचार्य रवींद्र पा चव्हाण , स इसाक सेठ नरसीकर, नारायण पा जाधव, पांडू पाटील चव्हाण, संजय चव्हाण, बाबासाहेब शिंदे, बालाजी शिंदे, रवींद्र भालेराव, दयानंद भालेराव, पंढरी भालेराव, डॉक्टर मधुकरराव राठोड , बाबुराव अडकिने, भुजंगराव पा शिंदे, गजानन चौधरी , गणपतराव पा धुपेकर, जगदीश कदम, माधव कंधारे , पत्रकार मंडळी , बाबू सावकार अरगुलवार दत्तात्रय लोकमानवार, सतीश मेडेवार, सूर्यकांत कवटीकवार, गणेश कोंडावार, साईनाथ मेडेवार, साईनाथ वट्टमवार ,सचिन चिद्रावार, पवन गादेवार,यासह सर्व नगरसेवक तालुक्यातील कुंटूर नरसी बरबडा मांजरम सर्कलमधील पदअधिकारी, कार्यकर्ते हजारोच्या संख्येने अभिष्टचिंतन सोहळ्यात उपस्थित झाले होते.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. If you continue to use this site we will assume that you are happy with it.AcceptPrivacy policy