वासवी माता जयंती निमित्ताने ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान !

[ नायगाव बा.ता. प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
आर्य वैश्य समाज बांधवाची कन्या का परमेश्वरी श्री वासवी माता जयंती निमित्ताने कै बायनाबाई उर्फ लक्ष्मीबाई वेंकटेश जवादवार यांच्या स्मरणार्थ ज्येष्ठ नागरिकांच्या सन्मान करण्यात येणार आहे.
     आर्य वैश्य समाज बांधवांची कुलस्वामिनी कन्याका परमेश्वरी माता जयंती निमित्ताने प्रसिद्ध व्यापारी यांच्या आई कै बायनाबाई उर्फ लक्ष्मीबाई व्यंकटी जवादवार यांच्या स्मरणार्थ ज्येष्ठ नागरिकांचा भव्य सन्मान सोहळा दिनांक 18 मे रोजी शनिवारी सकाळी आठ वाजता स्वामी रामानंद तीर्थ चौक जुन्या मोंढा राम मंदिराजवळ माजी आमदार वसंतराव चव्हाण व माजी जिल्हा परिषद सदस्य बालाजीराव बच्चेवार यांच्या हस्ते प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानपत्र शाल, हार, श्रीफळ देऊन ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान होणार आहे या कार्यक्रमास सर्व समाज बांधव यांनी उपस्थित राहावी अशी विनंती श्रीनिवास जवादवार वसंत जवादवार ,सुधाकर जवादवार, सामाजिक कार्यकर्ते मारोती राजेश्वर कात्तरवार यांनी केले.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या