वेरूळ किंवा एलोरा येथे ३४ लेणी आहेत. त्यापैकी १ ते १२ बौद्ध लेणी, १३ ते २९ हिन्दू आणि ३०ते ३४ नंबरची जैन लेणी आहेत.
(Source- समता स्पोर्टींग क्लब फेसबुक पेज )
वेरूळ येथील काही लेण्यांना “धेडवाडा” आणि दुसर्या काही लेण्यांना “महारवाडा” असे नाव आहे. “धेड” हा शब्द थेर ह्या शब्दाचा अपभ्रंश आहे. “धेडवाडा” आणि “महारवाडा” ही बौद्ध लेण्यांना दिलेली नावे आहेत. बौद्धांच्या विषयी वाटणाऱ्या द्वेषामुळे दिली नसून ती धार्मिक इतिहासातील सामाजिक स्थित्यंतराचा एक दुवा आहे.
वेरूळ किंवा एलोरा येथे ३४ लेणी आहेत. त्यापैकी १ ते १२ बौद्ध लेणी, १३ ते २९ हिन्दू आणि ३०ते ३४ नंबरची जैन लेणी आहेत.
बौद्ध लेणी करण्याचे काम सर्वात पहिल्यांदा म्हणजे इ.स.४५० च्या सुमारास सुरू झाले. आठव्या शतकातही बौद्ध लेण्यांत काही खोदकाम झाले असल्याच्या खुणा आहेत.
राष्ट्रीकुटांच्या कृषणराजाने स्वतःला शुभतुंग आणि अकालवर्ष अशो नावे धारण करून इ.स. ७५३ ते ७७५ मध्ये मराठवाडय़ातील मालखेड येथून राज्य केले. त्यानेच वेरूळ येथील जगप्रसिद्ध कैलास लेणे खोदवून घेतले. हे लेणे पूर्वी बौद्ध होते की नाही हे सांगता येणे कठीण आहे. परंतु त्याच्या शेजारचेच १७ नंबरचे “दशावतार” नाव असलेल्या बौद्ध लेण्याचे रूपांतर हिन्दू लेण्यांत केले गेले आहे.
राष्ट्रकुटांच्या नंतरच्या राजांच्या काळात वेरूळ येथील जैन लेणी कोरली गेली. ह्या जैन लेण्यांतील शिल्प अत्यंत सुंदर आहे.
वेरूळ येथील लेण्यांतील भिंतीवर सर्रास अनेक बौद्ध मूर्ती कोरलेल्या पाहावयास मिळतात.
तसेच दरवाजाच्या बाहेर दोन्ही बाजूस भव्य आकाराच्या बोधिसत्वाच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. बोधिसत्वांच्या समवेत बहुतेक ठिकाणी शक्ती, तारा , भृकटी यांच्या आणि इतर मूर्ती कोरलेल्या आहेत. अजंठा , एलोरा आणि कान्हेरी येथे निश्चितपणे बौद्ध विद्यालये असली पाहीजेत.
Www.massmaharashtra.com
Source –