उपनगराध्यक्ष विजय पाटील चव्हाण यांच्या अभिष्टचिंतन सोहळा तयारी विविध कार्यक्रमाचे आयोजन.

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
नायगाव मतदारसंघाचे माजी आमदार वसंतराव पाटील चव्हाण यांचे चुलत बंधू व नांदेड वाघाळा महानगरपालिकेचे उपमहापौर आनंदराव पाटील चव्हाण यांचे बंधू , नायगाव नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष विजय पाटील चव्हाण यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भव्य नेत्रदान शिबिर व विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

 

नायगाव मतदारसंघाचे माजी आमदार वसंतराव चव्हाण यांचे बंधू अष्टपैलू व्यक्तिमत्व विजय पाटील चव्हाण यांनी माजी आमदार वसंतराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली राजकारणात प्रवेश करून राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचे विश्वास संपादन केलेले युवा नेते नगरपंचायतीचे उपाध्यक्ष नावातच विजय असलेले युवकांच्या मनावर अधिराज्य गाजवत नायगाव परीसरात चालणाऱ्या सामाजिक व धार्मिक उपक्रमांना आर्थिक पाठबळ देणारा पाठीराख, तरुणांना सोबत घेऊन सामाजिक बांधिलकी जपणारा युवक नेता .मा.विजय पाटील चव्हाण यांना वाढदिवसाच्या निमित्ताने माजी आमदार वसंतराव चव्हाण मित्र मंडळाच्या वतीने नायगाव शहरात मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करून भव्य दिव्य जंगी स्वागत करण्यात येणार आहे.

 

वाढदिवसानिमित्ताने ०१ ऑक्टोबर २०२३ रोजी रविवारी सकाळी ९.३० वाजता नगरातील साईबाबा मंदिरात पूजन व महाआरती, सकाळी १०.०० ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप, सकाळी १०.३० वाजता, स्वामी समर्थ मंदिरात पादुका पूजन व महाआरती , सकाळी ११.०० महानेत्रदान तपासणी शिबिर शिबिराचे उद्घाटक युवा नेते रवींद्र पाटील चव्हाण व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत अभिष्टचिंतन सोहळा माजी आमदार वसंतराव चव्हाण संपर्क कार्यालयाच्या समोर व नायगाव नगरपंचायत कार्यालयाच्या पटांगणात होणार असून या कार्यक्रमासाठी शहरासह परिसरातील कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन माजी आमदार वसंतराव चव्हाण मित्र मंडळाच्या वतीने  युवा नेते रवींद्र पाटील चव्हाण, संजय पाटील चव्हाण, पांडू पाटील चव्हाण, माणिक पाटील चव्हाण,नारायण पाटील जाधव, पंढरी भालेराव, शरद भालेराव, रवींद्र भालेराव, दयानंद भालेराव,साईनाथ चन्नावार, विठ्ठल पाटील बेळगे आदीसह कार्यकर्त्यांनी आवाहन केले आहे.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या