उपनगराध्यक्ष विजय चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्ताने चहात्यांची प्रचंड गर्दी !

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
नायगाव नगरीचे युवा नेते लोकप्रिय नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष विजय पाटील चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

युवा नेते लोकप्रिय उपनगराध्यक्ष विजय पाटील चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्ताने मित्र मंडळाच्या वतीने सकाळी पानसरे नगरातील साईबाबा मंदिरात, स्वामी समर्थ मंदिरात व पशुपती महादेव मंदिरात जाऊन पूजा व महाआरती करण्यात आली.

जगद्गुरु नरेंद्र महाराज यांच्या भाविकांनी ठेवलेल्या, कार्यक्रमात उपस्थिती, ग्रामीण रुग्णालयात ब्लू बेल्स इंग्लिश स्कूलच्या वतीने ठेवण्यात आलेल्या मानवंदना व रुग्णालयातील डॉक्टर व प्रमुख कार्यकर्त्यांच्या हस्ते रुग्णांना फळ वाटप, नायगाव नगरपंचायतीच्या पटांगणात ठेवण्यात आलेल्या नगरपंचायतीच्या सह माजी आमदार वसंतराव चव्हाण मित्र मंडळाच्या वतीने ठेवण्यात आलेल्या नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष यांच्या वाढदिवसानिमित्ताने अभिष्टचिंतन सोहळ्यात विजय चव्हाण यांना खोबरं, खारीक व गुलाबाच्या हाराने भव्य दिव्य सत्कार करून केक कापण्यात आला. तसेच मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदूचे ऑपरेशन शिबिराचे उद्घाटन माजी आमदार वसंतराव चव्हाण यांच्या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी माजी आमदार वसंतराव चव्हाण यांनी आपले विचार व्यक्त करत असताना म्हणाले की, “नायगावसह परिसरातील नागरिकांनी चव्हाण परिवारावर पाठबळ व आशीर्वाद दिला म्हणून आम्ही राजकारणात सदैव यशस्वी झालो भविष्यात तुमचा आशीर्वाद व आपलं पाठबळ विजय पाटील चव्हाण यांच्यासह आमच्या कुटुंबावर सदैव राहो हीच आपणास विनंती करतो.” आमदार वसंतराव चव्हाण यांनी नायगाव नगरपंचायतीचे लोकप्रिय उपनगराध्यक्ष यांच्या वाढदिवसानिमित्ताने आयोजित केलेल्या आपले विचार व्यक्त केले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान माजी आमदार वसंतराव पाटील चव्हाण तर प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष मीनाताई कल्याण ,केशवराव पाटील चव्हाण , प्रदेश सचिव श्रावण रॅपनवाड,संभाजी पाटील भिलवंडे, बालाजीराव मदेवाड, हनमंतराव पाटील चव्हाण, आनंदराव पाटील चव्हाण, श्रीनिवास पाटील चव्हाण,संजय आप्पा बेळगे, सुधाकर पाटील शिंदे,माधवराव पाटील जाधव कृष्णरकर, रवींद्र पाटील चव्हाण,आनंदराव रेड्डी, डॉक्टर शिवाजी कागडे, डॉक्टर अडकिने, डॉक्टर पोलावार,डॉक्टर विश्वास चव्हाण, डॉक्टर कोठेकर ,डॉक्टर खंडगावकर, यांच्यासह प्रमुख मान्यवरांचे उपस्थित होते विश्वचिंतन सोहळ्यामध्ये विजय पाटील चव्हाण म्हणाले की माझ्या राजकारणाच्या जीवनात सन 1999 काळात आदरणीय माजी आमदार वसंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली माजी आमदार वसंतराव चव्हाण मित्र मंडळाची स्थापना करून अध्यक्ष पदाची जबाबदारी करण्यात आले होते.
माझ्यासोबत सदस्य म्हणून सय्यद रहीम शेठ ,संजय आप्पा बेळगे ,बालाजी चव्हाण, सुधाकर पाटील शिंदे विश्वनाथ तमलूरे, यांच्यासह कार्यकर्त्यांनी पाठबळ दिल्याने आमचे बंधू वसंतराव चव्हाण यांच्या आशीर्वादाने पहिल्यांदाच मार्केट कमिटीचे जबाबदारी माझ्या अध्यक्ष म्हणून टाकण्यात आले त्यावेळी मार्केट कमिटीचे कर्ज माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण यांच्या माध्यमातून माफ केले , नगरपंचायतीची माझ्यावर जबाबदारी टाकल्यानंतर नायगाव शहरात गोरगरिबांना घरकुले मोठ्या प्रमाणात मंजूर करून, शासनाच्या माध्यमातून आलेल्या कोट्यावधी रुपयाचा लाभार्थ्यापर्यंत लाभ देण्याचा प्रयत्न केला. 
शहराच्या विकासासाठी रस्ते नाली पाणी लाईटची व्यवस्था चांगल्या पद्धतीने करून शहराचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न केवळ माजी आमदार वसंतराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी मला मिळाले मी भाग्यवान समजतो व आपले प्रेम सदैव आमच्या पाठीशी कुटुंबावर राहू असे मत उपनगराध्यक्ष विजय चव्हाण यांनी कार्यक्रमाच्या प्रसंगी व्यक्त केले, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी , मित्र मंडळाचे विराज चव्हाण,संजय पाटील चव्हाण ,पांडू पाटील चव्हाण, माणिक पाटील चव्हाण, बाबासाहेब शिंदे ,श्रीनिवास शिंदे , नारायण जाधव, साईनाथ चन्नावार, विठ्ठल पाटील बेळगे, शरद भालेराव, रवींद्र भालेराव, दयानंद भालेराव ,यांनी मोलाचे काम केले.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या