विठ्ठल दिंडीतून विजय पटणे मेमोरीयल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी नागरिकांचे जिंकली मने ; भारतीय संस्कृतीचे जतन !

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
आंतरभारती शिक्षण संस्था अंतर्गत असलेल्या विजय पटने मेमोरीयल स्कूलच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही आषाढी एकादशी निमित्त शहरातून विठ्ठल दिंडी करण्यात आली, या दिंडीत लहान बालकांनी विठ्ठल रुक्मिणी यांच्या वेशभूषा परिधान करून विठ्ठलाच्या भक्तीमय गीतावर नृत्य सादर करून नागरिकांची मने जिंकले आहेत…
बिलोली येथील विजय पटणे मेमोरीयल स्कूलच्या वतीने दरवर्षी नवनवीन उपक्रम राबविले जातात त्याच अनुषंगाने आषाढी एकादशी निमित्त शाळेच्या वतीने विठ्ठल दिंडी शहरातील गांधीनगर, पंचायत समिती, तहसील कार्यालय, मारोती मंदिर, जुना बस स्थानक आदी परिसरातून काढण्यात आली. या दिंडीत लहान बालकांनी विठ्ठल रुक्मिणी व विविध संतांच्या वेशभूषा परिधान करून मृदंगाच्या तालावर नृत्य व पावले टाकत भारतीय परंपरांचे जतन केले आहे.
यावेळी या संस्थेचे सहसचिव तथा मुख्याध्यापिका जयमाला पटणे, मुख्याध्यापक विठ्ठल चंदनकर, विनायक इंगळे, संध्या पाटील, राजश्री लचणे, आदीसह शाळेचे सर्व शिक्षक वृंद व पालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या