विजय पटणे मेमोरियल शाळेत दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप !

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
येथील आंतर भारती शिक्षण संस्थे अंतर्गत असलेल्या विजय पटणे मेमोरियल या शाळेत इयत्ता दहावीच्या विध्यार्थ्यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम घेऊन त्यांना निरोप देण्यात आला. यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून गट शिक्षणधिकारी तोटरे यांनी विध्यार्थ्यांना सखोल मार्गदशन करून प्रोत्साहित केले.

यावेळी या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून संस्थेचे सहसचिव तथा मुख्याध्यापिका श्रीमती जयमाला पटणे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून गट शिक्षणधिकारी तोटरे, सहशिक्षक दत्तात्रय साखरे, सुरेश सोनकांबळे आदींसह शाळेचे मुख्याध्यापक गंगूलवार, विजय गायकवाड, विजया कदम, विकास मिसाळे, संध्या पाटील, सुदेशना देवठाणे, पूजा वाघमारे, श्रद्धा पूर्वी, प्रियंका यमेकर, शिरगिरे सर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्रद्धा पूर्वी यांनी केले तर आभार शिरगिरे सर यांनी मानले.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या