कुंडलवाडीत २० ऑक्टोबर रोजी ना.विजय वडेट्टीवार यांची सभा !

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
देगलूर बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना महाविकास आघाडीचे उमेदवार जितेश रावसाहेब अंतापुरकर यांच्या प्रचारार्थ आज दि. २० ऑक्टोबर रोजी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना. विजय वडेट्टीवार यांची कुंडलवाडी शहरातील नगराध्यक्ष निवासस्थान समोरील जागेत दुपारी ४:३० वाजता प्रचार सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेस कुंडलवाडी शहर व परिसरातील नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन महाविकास आघाडीतर्फ करण्यात आले आहे.
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या