श्री.विक्रम पाचंगे “राष्ट्रीय शिक्षकरत्न” पुरस्काराने सन्मानित !
[ म्हसळा प्रतिनिधी – प्रा.अंगद कांबळे ]
तुळजापूर तालुक्यातील जळकोट परिसरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मानमोडी येथील प्राथमिक पदवीधर श्री. विक्रम बलभीमराव पाचंगे यांना प्युपील्स ऑलिंपिक असोसिएशन इंडिया यांच्यावतीने सोलापूर येथे शिवस्मारक या ठिकाणी भारत देशाचा स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव याचे औचित्य साधून “राष्ट्रीय शिक्षकरत्न” पुरस्काराने गौरविण्यात आले.
यावेळी पूपिल्स ऑलिंपिक असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर महेश मोटे, आमदार प्रणितीताई शिंदे, लाठी असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष सुभाष मोहिते, शिवराम भोसले, अजय शहा, सचिव महंमद रफी शेख, लाठी महाराष्ट्र राज्य संघटनेचे राज्यअध्यक्ष युसुफ मुल्ला, मराठा सेवा संघाचे अनिल सगर, साहित्यिक अमर देशटवार, श्री भैरवनाथ कानडे सर, श्री. बलभीमराव पाचंगे सर तसेच अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत श्री.विक्रम पाचंगे यांना शैक्षणिक क्षेत्रातील व सामाजिक क्षेत्रातील भरीव कामगिरीमुळे “राष्ट्रीय शिक्षकरत्न” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
मास महाराष्ट्र न्युज -Www.massmaharashtra.com
रायगड जिल्ह्यात प्रतिनिधी नेमणे आहे.
संपर्क – 9834102351