विलास पवार यांची जिल्हा काँग्रेसच्या विधानसभा उपाध्यक्ष युवक काँग्रेस पदी निवड !

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
येथील विलासराव पवार गोळेगावकर यांची नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या विधानसभा उपाध्यक्षपदी निवड नांदेड जिल्ह्याचे माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांच्या हस्ते प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत प्रमाणपत्र देऊन निवड करण्यात आली.
येथील विलासराव पवार गोळेगावकर यांची नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या विधानसभा उपाध्यक्ष युवक काँग्रेसपदी नांदेड जिल्ह्याचे माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर व जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष गोविंदराव पाटील नागरिक तसेच डॉ मीनलताई खतगावकर यांच्या सह प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत निवड करण्यात आली व विलासराव पवार यांना नियुक्तीपत्र देण्यात आले पत्रात असे नमूद केले आहे की काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले व राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या शिफारशीनुसार निवड करण्यात आली असून आपण काँग्रेस पक्षाच्या ध्येय धोरणानुसार सर्व समाजातील जाती धर्मातील घटकांना घेऊन पक्ष वाढीसाठी प्रयत्न करण्यासाठी आपली निवड केली आहे असल्याचे नियुक्तीपत्र काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव पाटील नागेलीकर यांनी दिले आहे
यावेळी बाळासाहेब पाटील खतगावकर, आनंदराव पाटील चव्हाण , सूरजीतसिंग गिल, शिवाजीराव धर्माधिकारी, रवी पाटील खतगावकर , राजू गंदीगुडे ,मनोहर पवार, माधवराव कंधारे, यांनी निवडी बद्दल विलास पवार यांना काँग्रेस पक्षाच्या वतीने अभिनंदन भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या असून या निवडीबद्दल सर्व तालुक्यात जिल्ह्यात अभिनंदन होत आहे.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या