मैत्रिचे दिलदार विश्वस्त श्री विनोद (भाऊ )लटके !
[रायगड प्रतिनिधी – प्रा.अंगद कांबळे]
काही नाव आणि काही गाव मनात कायमची घर करुन राहतात. मैत्रिच्या विश्वातील विनोद भाऊ शेठ लटके याच परंपरेतील एक विश्वस्त आहेत. आपल्या हॉटेल उद्योग व्यवसायातून प्रत्येकांक्षी नाते जोडणारे विनोद भाऊ लटके माणसांना आकर्षित करणारे मित्तभाषी व्यक्तिमत्व आहे.
म्हसळा तालुक्यातील नेवरुळ येथील रामचंद्र भिकू लटके यांच्या परिवारतात विनोद शेठ यांचा जन्म 15/11/1976 रोजी झाला घरचा दुग्धउत्पादनाचा आणि वितरणाचा व्यवसाय करीतच हॉटेल सारख्या व्यवसायात 30 वर्ष यशस्वीपणे व्यवसाय करत समाजातील प्रत्येकाशी सुसवांद साधत आहेत. व्यवसाय कोणता आहे या पेक्षा व्यवसायातून माणुसकी, विश्वास, सहकार्य, आणि मार्गदर्शन करण्याचे संस्कार यांच्यावर आहेत. हल्ली व्यवसायाला नफा तोट्याचे सूत्र माणले जाते परंतू विनोद शेठ यांनी ग्राहकांशी आपले नाते निर्माण केले आहे. केवळ व्यवसायच न करता सामाजिक बांधिलकी जोपासत अनेकांना अड़अडचणीच्या काळात मदत करण्यासाठी विनोद शेठ सक्रीय असतात विनोद शेठ यांचे हॉटेल न रहाता अनेकांच्या विचारविनिमयाचे केंद्र बनले आहे.
सामाजिक, राजकीय, शांसन, प्रशांसन, शिक्षण, सहकार, क्रीड़ा या क्षेत्रातील अनेक मान्यवरांशी हितसंबंध जोपासून आपले व्यक्तिमत्व असामान्य होवूण गेले आहे ग्राहकांशी हे मर्यादित नाते न ठेवता परिसरातील आबालवृद्धचे चाहते आहेत विनोद शेठ यांच्या सहवासात ज्या, ज्या व्यक्ति सहवासात आल्या त्यांच्या गळ्यातील ताईत विनोद शेठ झाले आहेत. सामन्यातल्या सामन्य ग्राहकाला आदराची वागणूक देऊन “ग्राहक” हेच जनसंपर्काचे संबध म्हसळा तालुक्यात नेटवर्क जोडले आहे.
नेवरूळ येथील प्रत्येक नागरिकांशी आपुलकिने, सहकार्य करणारे विनोद शेठ ग्रामस्थांना आपलेच वाटतात म्हसळा तालुक्यातील प्रत्येक घटकांशी विनोद शेठ जुळलेले आहेत त्यामुळे त्यांच्याशी प्रत्येकजन आपल्या जीवभावातील भावना विचारव्यक्त करतात या सर्व जडण घड़नी मध्ये त्यांच्या आई वडिलांचा खुप मोठा वाटा आहे आई सौ रुक्मिणबाई व् वडील रामचंद्र लटके यांचे संस्कार खुप महत्वाचे आहेत त्यांनी आपल्या तीनीही मुलांवर केलेले दिसून येतेय वेळप्रसंगी आईने वडील मुंबईला असताना डोक्यावर नेवरुळ ते म्हसळा लाकडाची मोळी बाजारात आणून विकल्या व् आपला कुटुंब प्रपंच चालवला व् मुलांचे शिक्षण चालू ठेवले यातूनच त्यांनी आपल्या मुलांवर केलेले संस्कार जाणवतात मोठ्या भावांचे शिक्षण चालू असल्याने विनोद शेठ यांनी आपल्या वडिलांना कामात मदत करू लागले आणि त्यांना शिक्षण मध्येच सोडवे लागले याची खंत मात्र त्यांना सतत जाणवत असे आणि ते बोलूंण ही दाखवत असे की परस्थितीमुळे मला शिकता आले नाही पण माझे मुले शिकले पाहिजेत. आणि योगयोगाने त्यांच्या सौभग्यावति सौ श्वेता वहीनी या खुप प्रेमळ स्वभावाच्या व् शिक्षणा विषयी चौकस नजरेच्या असून मुलांच्या शिक्षणा प्रतिलक्ष देऊन आहेत मोठी मुलगी कु. श्रुति हिने दहावी ला 82% इतके गुण तर बारावीला 83% चांगले गुण घेऊन पास झाली आहे तिला पुढे सीे. ए. बनायचे आहे तर मुलगा वेदांत हा दहावी ला आहे याचे सर्व श्रेय सौ श्वेता वहिनीना जाते. अशा या मैत्रिच्या दिलदार विश्ववस्ताला वाढदिवसा निमित्ताने आरोग्य उत्तम लाभों हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
– (शब्दंकन प्रा. महंमद शेख सर )
युट्युब चॅनल ला सबस्क्राईब करण्यासाठी फोटोवर क्लिक करा.