कुंडलवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रातून डॉ विनोद माहुरे यांना निरोप !

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
         येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ विनोद माहुरे यांची औरंगाबाद येथे वैद्यकीय पदव्युत्तर (एम डी ) शिक्षणासाठी निवड झाली त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रातून ते कार्यमुक्त झाल्यामुळे त्यांच्या निरोपाचा निरोप समारंभाचा कार्यक्रम दिनांक 31 रोजी सायंकाळी 5 वाजता संपन्न झाला आहे.

          डॉ विनोद माहुरे हे कुंडलवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्या पाच वर्षापासून वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होते, त्यांनी आपल्या कार्यकाळात रुग्णांची अत्यंत प्रामाणिकपणे सेवा केली आहे तर कोरोना काळात शहरात प्रभावीपणे आरोग्य यंत्रणा राबविण्याचे काम हि केले आहे. तसेच त्यांनी रुग्णसेवे सोबतच सामाजिक कार्यात अग्रेसर होते,अशा कर्तव्य कर्तव्यदक्ष वैद्यकीय अधिकाऱ्यांची एम डी या वैद्यकीय शिक्षणासाठी त्यांची औरंगाबाद येथे निवड झाल्यामुळे त्यांच्या निरोप समारंभाचा कार्यक्रम दिनांक 31 रोजी सायंकाळी पाच वाजता प्राथमिक आरोग्य केंद्र संपन्न झाला आहे.
           यावेळी शहरातील अनेक मान्यवरांनी डॉ माहुरे प्रति आपले मनोगत व्यक्त केले आहे. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून नवनिर्वाचित बाजार समितीचे संचालक डॉ हनमंत लखमपुरे तर प्रमुख पाहुणे म्हणून सोसायटीचे माजी चेअरमन साईनाथ उत्तरवार,सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वजीत कासले, वैद्यकीय अधिकारी डॉ पाटील,डॉ प्रशांत सब्बनवार,डॉ संतोष पाटील,डॉ नरेश बोधनकर,के रामलू पब्लिक स्कुलचे अध्यक्ष सायरेड्डी ठक्कुरवाड,कल्याण गायकवाड,आदींसह पत्रकार, आरोग्य कर्मचारी, गावातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून डॉ माहुरे यांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या