विराज पाचंगे यांची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड !

[ उस्मानाबाद /उमरगा प्रतिनिधी – प्रदीप कांबळे ]
मनोहर पर्रीकर क्रीडासंकुल मडगाव गोवा येथे दिनांक 26 ते 30 डिसेंबर 2021 या कालावधीत पार पडलेल्या राष्ट्रीय अजिंक्यपद सिकई मार्शल आर्ट स्पर्धा पार पडल्या यामध्ये देश पातळीवरील गोवा, महाराष्ट्र जम्मू कश्मीर, वेस्ट बंगाल, अंदमान-निकोबार, पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश, तामिळनाडू इतर असे 27 राज्यांनी सहभाग घेतला.

या स्पर्धेत उमरगा येथील रहिवासी आणि तुळजापूर तालुक्यातील मानमुडी शाळेचे मुख्याध्यापक श्री.विक्रम पाचंगे सर यांचे चिरंजीव कु.विराज विक्रम पाचंगे यांनी एरोसिकई या ग्रुप खेळामध्ये घवघवीत यश प्राप्त केले. विराज यांची निवड आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी झाली असून याचे सर्वत्र कौतुक होत आहे. या क्रीडा प्रकारांचे एरोसिकई असोसिएशनचे महाराष्ट्र अध्यक्ष मजहर खान, सचिव रवींद्र गायकी मुख्य कोच महमदरफी शेख यांचे मार्गदर्शन लाभले.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या