आधुनिक एकलव्याने अंगठ्याचे दान करू नये – वीरभद्र मिरेवाड !

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
आजच्या युवकाने आपली प्रतिष्ठा आणि प्रतिमा राखत स्वतःवरचा विश्वास वृद्धिंगत केला पाहिजे .आपण कुठे चुकतो आणि आपल्याकडून काही अनावधानाने कोणी हिसकावून घेत नाही ना याची जाण प्रत्येक युवकाने ठेवली पाहिजे असे मत वीरभद्र मिरेवाड यांनी व्यक्त केले.
तालुक्यातील मौजे शेळगाव छत्री येथे आद्यकवी महर्षी वाल्मिक ऋषी सार्वजनिक जयंती सोहळा आयोजित करण्यात आलेल्या वेळी अध्यक्षस्थानी संजय पाटील चोंडे तर उद्घाटक संजय पा. आणेराये प्रमुख अतिथी बहुजन समाजाचे नेते बालाजीराव मद्देवाड व प्रमुख व्याख्याते वीरभद्र मिरेवाड, कवी वेंकट आणेराये, पत्रकार माधव बैलकवाड व नगरसेवक हनुमंत बोईनवाड आदिवासी कोळी संघाचे युवा प्रदेशाध्यक्ष काशिनाथ मानेमोड, जिल्हाध्यक्ष शंकर तमनबोईनवाड, बेटकबिलोलीचे सरपंच उत्तम रोडेवाड, राहेरचे सरपंच साईनाथ पिल्लेवाड, शेळगाव छत्रीचे सरपंच जळबा वाघमारे, दादाराव पाटील कहाळेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते आद्यकवी महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. तर ध्वजारोहण ज्येष्ठ साहित्यिक वीरभद्र मिरेवाड यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. जयंती मंडळाच्या वतीने मान्यवर व पाहुण्यांचा सन्मान करण्यात आला. आपल्या प्रस्ताविकातून पत्रकार माधव बैलकवाड यांनी वाल्मीक रुषी व आजचा समाज या विषयी भूमिका विशद केली.
तर साहित्यिक, कवी, वेंकट आणेराये यांनी रामायण व इतिहासाचे अनेक दाखले देत समाजाला सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी सेवानिवृत्त सैनिक गंगाधर शहापुरे, ज्येष्ठ नागरिक पुंडलिक पाटील आणेराये, शेळगाव छत्रीचे माधव शहापुरे, शिक्षक वृंद वेंकट शहापुरे, गंगाधर सालेगाये, मारुती सालेगाये, दिलीप निलावार,सचिन निलावार, उद्धव महाराज चोंडे, संभाजी निलावार, विठ्ठल एंजेपवाड,खंडु बैलकवाड, विजय बैलकवाड, यासह जयंती मंडळाचे आयोजक माधव एंजेपवाड, नागेश एंजेपवाड, मारुती ऐंजपवाड, राजाराम एंजेपवाड, माधव लक्ष्मण एंजेपवाड, सदस्य भगवान बोंडलवाड, हनुमंत डोमलवाड, संतोष ऐंजपवाड, बाबुराव बोईनवाड यासह समाजातील महिला पुरुष यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती तर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विजय आणेराये यांनी केले तर आभार गुरुनाथ सालेगाये यांनी मानले.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या