मुखेड येथील ग्रामदेवता पुरातन कालीन वीरभद्र यात्रेनिमित्त मंदिरात भाविकांची गर्दी !

[ नायगाव बा. तालुका प्रतिनिधी- गजानन चौधरी ]
मुखेड येथील ग्रामदेवता समजली जाणाऱ्या पुरातन कालीन वीरभद्र यात्रेनिमित्त मंदिरात दर्शनाला भाविकांची मोठी गर्दी झाली.

नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथील ग्रामदेवता समजले जाणाऱ्या पुरातनकालीन भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या महादेवाचा पुत्र वीरभद्र यात्रेनिमित्ताने भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

या निमित्ताने दिनांक 13 नोव्हेंबर रोजी वीरभद्र यात्रेनिमित्ताने शासनाच्या वतीने विद्युत रोषणाई करण्यात आले होते. भाविकांनी रात्री गुळ प्रसाद वाटप केला तो रात्रभर मंदिराच्या आवारामध्ये भक्ती गीतांचा कार्यक्रम झाला.

या कार्यक्रमानंतर दिनांक 14 नोव्हेंबर रोजी पहाटे वीरभद्राचे विधीवत अभिषेक करून पूजा अर्चा आरती मानकरी यांच्या हस्ते झाल्यानंतर अग्नि कुंडातून पालखी मिरवणूक काढून सदर भव्य दिव्य मिरवणुकी गावातून वाजत गाजत काढली जाते यावेळी अग्नि कुंड तूडवण्यासाठी व दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांनी गर्दी केली. सदर यात्रा ही पाच दिवस विविध कार्यक्रमाने साजरी केले जाते यात्रेमध्ये अनुचित प्रकार घडू नये पोलिसांच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या