विविध मागण्यासाठी “विहिंप”चे बेमुदत साखळी उपोषण !

[ कुंडलवाडी प्रतिनिधी- अमरनाथ कांबळे ]
          दि.०२ बिलोली शहर तथा परिसरातील गो मांस विक्री व वाहतूक बंद करण्यात यावी तथा गौ-हत्या प्रतिबंधक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी विश्व हिंदु परीषद व बजरंग दल बिलोली प्रखंड च्यावतीने उपविभागीय कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण करण्यात येत आहे.
      बिलोली शहरालगत सावळी-कोंडलापुर मार्गावर तीन हाडाचे चूर्ण बनविणारे कारखाने आहेत.कारखान्याच्या दुर्गंधीमुळे शालेय विद्यार्थी, ग्रामस्थ व परिसरातील शेतकऱ्यांना त्याचा त्रास होत आहे.
प्रदूषण विभागाच्या नियमांचे उल्लंघन करून कारखाने सूरू आहेत. हे कारखाने व कारखान्यांना मृत पाळीव प्राण्यांची हाडे घेऊन जाणारी वाहणामुळे शहर व परिसरात मोठी दुर्गंधी पसरते आहे. त्यामुळे हे तीनही कारखाने बंद करण्यात यावेत.बिलोली शहर तथा परिसरातील गो मांस वाहतूक विक्री व वाहतूक बंद करून गौ हत्या प्रतिबंधक कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी विश्व हिंदु परीषद व बजरंग दल बिलोली प्रखंड च्यावतीने बिलोली उपविभागीय कार्यालया समोर बेमुदत साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे.
निवेदनावर बजरंग दल देवगिरी प्रांत सह संयोजक गजानन पांचाळ, विश्व हिंदु परीषद तालुका मंत्री मारोती पाटील जाधव, बजरंग दल बिलोली तालुका संयोजक अविनाश डोपोड, जिल्हा गो रक्ष प्रमुख ऋषिकेश गोगरोड, तालुका गो सेवा प्रमुख साईनाथ शंखपाळे यांच्या स्वाक्षरी आहेत.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या