बिलोलीत कडक पोलिस बंदोबस्तात ; विश्वहिंदु परिषद, बजरंग दल जिल्हा शौर्य पथसंचलन व धर्मसभा शांततेच्या वातावरणात संपन्न !

[ बिलोली प्रतिनिधी – सुनिल जेठे ]

बिलोली येथे विश्व हिंदु परिषद, बजरंग दल जिल्हा शौर्य पथसंचलन व धर्मसभेचे आयोजन कुंडलवाडी रोड जिल्हा परिषद हायस्कुल बिलोली येथे दि. २५ डिसेंबर रोजी ३ वाजता केलेल्या कार्यक्रमात विरुपक्ष शिवाचार्य महाराज (गणाचार्य मठसंस्थान मुखेड) डॉ.रविकुमार चटालावार यांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेचे पुजन व मान्यवरांच स्वागत करुन शौर्य पथसंचलना नंतर धर्मसभा संपन्न झाली आहे.

सदरिल विश्व हिंदु परिषद, बजरंग दल जिल्हा शौर्य पथसंचलन जिल्हा परिषद हायस्कुल बिलोली पासुन, जुन्या गावामधुन गांधीचौक मार्ग ते साठेनगर पर्यत जावून पुन्हा परिषद हायस्कुल येथील कार्यक्रमा ठिकाणी येऊन धर्मसभेत राष्ट्रीय कवी मुकेश मोलवा यांनी व इतर मान्यवरांनी भाषणाच्या माध्यमातून येथील सर्व स्वयंसेवकांना, नागरीकांना मार्गदर्शन केले.
यावेळी मठसंस्थान कंदकुर्तीचे सिताराम महाराज, सत्यानंद स्वामी महाराज, सितारामदास महाराज, राजकुमार गोउरो, नारद गिरी महाराज, वि.हि.प.जि. उपाध्यक्ष श्री.गिरीसवझलवार, वि.हि.प.जिल्हाध्यक्ष नविनभाई ठक्कर, सिध्दयाल महाराज, प्रा.सु.ज.चव्हाण, कृष्णा देशमुख, गणेश महाराज, मनोज रापतवार, बजरंदल जिल्हाअध्यक्ष गजानन पांचाळ, साईनाथ गंगुलवार, मुकेश जोशी, संजय तोटलवार, सतीश गौड, यांच्या सह अनेक विश्व हिंदु परिषद, बजरंग दल जिल्हा शौर्य पथसंचलन, धर्मसभेसाठी उपस्थित होते.
शौर्य पथसंचलन,धर्मसभेच्या कार्यक्रमात पोलिस उपविभागिय  अधिकारी श्री.आर्चित चांडक, पो.नि.शिवाजी डोईफोडे, पो.नि.भगवान धबडगे, सहा.पो.निरीक्षक नागनाथ सनगले, केंद्रे, यांच्यासह विशेष पोलिस पथक कर्मचारी यांनी कडक पोलिस बंदोबस्त केले ठेवला. बिलोली शहरात शांततेच्या वातावरणात विश्व हिंदु परिषद, बजरंग दल जिल्हा शौर्य पथसंचलन, धर्मसभा कार्यक्रम संपन्न झाला. सदरिल या कार्यक्रमाचे सुञसंचलन डाॅ.गोपाळ चौधरी यांनी केले.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या