मागील दहा वर्षापासून विविध सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या विश्वकर्मा सेवा संघ नांदेडच्या वतीने गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा व उपवर -उपवधू परिचय मेळाव्याचे आयोजन दिनांक 9 जुलै रोजी शंकरराव चव्हाण पेक्षागृह नांदेड येथे करण्यात आले आहे. नांदेड जिल्ह्यातील विश्वकर्मा समाजातील सन 2023 मध्ये इयत्ता दहावी 75 टक्के पेक्षा अधिक इयत्ता बारावी 70 पेक्षा अधिक गुणवत्ताधारक यूपीएससी, एमपीएससी, निवड झालेल्या व एमबीबीएस, इंजीनियरिंग प्रवेश पात्र ठरलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे,तसेच सामाजिक बांधिलकी जपत वधू वर पितांच्या सोयीसाठी उपवर वधू-वर परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष अरुण गंगाधरराव उपलवार माजी नगरसेवक नगरपरिषद बिलोली तर प्रमुख अतिथी डॉ श्रीकांत पाटील अध्यक्ष क्रिप्स भोपाळ, डॉ कृष्णनाथ पांचाळ मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ, मारोतराव कवळे गुरुजी अध्यक्ष व्ही पी के उद्योगसमूह उमरी, डॉ नागेश्वर पांचाळ छत्रपती संभाजी नगर आदी प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी या विश्वकर्मा पांचाळ समाजाच्या गुणगौरव सोहळ्यासाठी सर्व विश्वकर्मीय समाज बांधव व भगिनींनी उपस्थित रहावे असे आवाहन बिलोली तालुका विश्वकर्मा सेवा संघाच्या वतीने करण्यात आले आहे .
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. If you continue to use this site we will assume that you are happy with it.AcceptPrivacy policy