विश्वकर्मा समाजासाठी स्वंतत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची अर्थसंकल्पात तरतूद करा –  शिवानंद पांचाळ यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

नायगांव प्रतिनिधी :- ८ मार्च
विश्वकर्मिय सुतार,लोहार,सोनार, तांबट, पाथरवट,या समाजाचा आर्थिक विकासदर पाहता मुख्य प्रवाहाचा विकास दर पाहता त्या तुलनेत हा समाज आज खुप मागासलेला आहे, समाजाचा पारंपरिक व्यवसाय डव घाईस आलेला आहे, नव नवीन यांत्रिक करणाने नव नवीन आधुनिक करणाने या समाजातील कारागीर बांधवांचे पारंपरिक व्यवसाय बुडाले नव नवीन व्यवसाय नवीन यांत्रिक प्रशिक्षण घेण्यात हा समाज कमी पडला.

आज नविन यंत्रे सामुग्री घेण्यासाठी बॅक कर्ज देत नाही शासनाने सबसिडी देऊन कमीत कमी कागदपत्रात कर्ज उपलब्ध करून द्यावे तरच हा समाज मुख्य प्रवाहात येऊ शकेल अन्यथा हा समाज भिकेला लागेल,तसेच याच समाजाचा नाते संबंध असलेला लोव्हार समाजाचा एन. टी.प्रवर्गात समावेश असून त्याच प्रमाणे, या सुतार समाजाचाही एन.टी. प्रवर्गात समावेश करण्यात यावा या मागणीचे निवेदन थेट राज्याचे मुख्यमंत्री मा.उध्दव ठाकरे,तथा राज्याचे उपमुख्यमंत्री मा.अजित पवार यांच्याकडे नायगांव तहसीलदार यांच्या मार्फत सामाजिक कार्यकर्ते शिवानंद दत्तात्रय पांचाळ नायगांवकर यांनी केली आहे.
निवेदन सादर करते वेळी विश्वकर्मा समाजातील सक्रिय कार्यकर्ते संभाजी शंकरराव पांचाळ नायगांवकर यांनी उपस्थित राहून निवेदनावर स्वाक्षरी केली आहे, स्वांतत्र्यापासुन आजपर्यंत उपेक्षित राहिलेल्या राज्यातील विश्वकर्मिय सुतार, लोव्हार, सोनार, तांबट, पाथरवट,समाजाला न्याय कधी ? मिळणार, की असेच शेकडो वर्षे त्यांना खितपत पडावे लागणार असा न्युनगंड समाजात निर्माण होते आहे, यासाठी उपेक्षित विश्वकर्मिय समाजाला शासनाने न्याय द्यावा असे मत – शिवानंद दत्तात्रय पांचाळ नायगांवकर यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले,

ताज्या बातम्या