विश्वकर्मिय समाजासाठी स्वंतत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करा – शामलताई कळसे

(नायगांव प्रतिनिधी – शिवानंद पांचाळ नायगांवकर)
दि.७ मार्च
विश्वकर्मिय सुतार,लोहार,सोनार, तांबट, पाथरवट,या समाजाचा आर्थिक विकासदर पाहता मुख्य प्रवाहाचा विकास दर पाहता त्या तुलनेत हा समाज आज खुप मागासलेला आहे, समाजाचा पारंपरिक व्यवसाय डव घाईस आलेला आहे.
नव नवीन यांत्रिक करणाने नव नवीन आधुनिक करणाने या समाजातील कारागीर बांधवांचे पारंपरिक व्यवसाय बुडाले नव नवीन व्यवसाय नवीन यांत्रिक प्रशिक्षण घेण्यात हा समाज कमी पडला आज नविन यंत्रे सामुग्री घेण्यासाठी बॅक कर्ज देत नाही.
शासनाने सबसिडी देऊन कमीत कमी कागदपत्रात कर्ज उपलब्ध करून द्यावे तरच हा समाज मुख्य प्रवाहात येऊ शकेल याच समाजाचा नाते संबंध असलेला लोव्हार समाजाचा एन. टी.प्रवर्गात समावेश असून त्याच प्रमाणे, या सुतार समाजाचाही एन.टी. प्रवर्गात समावेश करण्यात यावा असे मत सामाजिक कार्यकर्त्या शामलताई भारत कळसे नांदेड यांनी प्रसिद्धि  पत्रकातून मांडले आहेत.

ताज्या बातम्या