देवेंद्र फडणवीस यांचा चिवळी येथे दुष्काळी पाहणी दौरा !

[ नरसी प्रतिनिधी – गणेश कंदुरके ]

आज अतिवृष्टी भागाची पाहणी करण्यासाठी नांदेड दौऱ्यावर असलेले विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस यांनी राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त मौजे चिवळी तालुका मुखेड जिल्हा नांदेड येथे प्रत्यक्ष पाहणी केली.

सोबत विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण जी दरेकर, खासदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार राजेश जी पवार, आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार तुषार राठोड, श्रावण पाटील भिलवंडे, गणेश कंदुरके, माधव कंधारे, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष रामरावजी मस्‍कले, भारतीय जनता पार्टी तालुकाध्यक्ष वीरभद्र हिमगिरे, नगरसेवक राजकुमार बामणे, डॉक्टर उमेश पाटील येवतीकर, प्राध्यापक शंकरराव गोरे सर, पोलीस पाटील सदाशिव पाटील, चेअरमन बालाजी पाटील गोरे, ओबीसी समाजाचे नेते व्यंकटराव जायनूरे, चिवळी चे सरपंच प्रतिनिधी ब्रह्माजी गजले, उपसरपंच शिवाजी वाघमारे, ग्रामसेवक अनिल पाटील, कृषी मंडळ अधिकारी फुलारी साहेब, कृषी मंडळ अधिकारी विकास नारळीकर, कृषी सहाय्यक सेटवाड मॅडम, ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी बालाजी पाटील गोरे, ग्रामपंचायत सदस्य संदीप जायनुरे, युवा नेते संदीप पाटील जाधव, गजानन पाटील गोरे, बसवराज गोरे, बाबुराव जानूयरे सिताराम गजले, परमेश्वर गोरे, अमोल जायनुरे, नागेश जायनूरे, देविदास क्यादरकुंटे, दीपक गोरे माधव वाघमारे, नागोराव वाघमारे, वेकटराव वाघमारे, माधव पाटील गोरे, सयाजी गजले, साईनाथ जायनूरे, नागोराव परसे, आदी सर्व मान्यवर अतिवृष्टीची पाहणी करताना उपस्थित होते.
या वेळी ओ बी सी नेते वेकटराव जायनुरे यांनी पुनर्वसन संदर्भात देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. देवेन्द्र फडणवीस यांनी मी सोता लक्ष देऊन गावचं पुनरवासनासाटी प्रयत्न करतो.
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या