ISO मानांकन प्राप्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बावलगाव येथे सेवा निवृत्त सनदी अधिकारी मधु जी गिरगावकर यांची भेट.

(बिलोली ता.प्र – सुनिल जेठे)
बिलोली तालुक्यातील बावलगाव येथील जिल्हा परिषद शाळेस माझी शाळा सुंदर शाळा अंतर्गत तालुका स्तरीय द्वितीय पारितोषिक मिळाल्याने सेवा निवृत्त सनदी अधिकारी श्री मधु जी गिरगावकर यांनी भेट देऊन पाहणी केली व मुख्याध्यापक साईनाथ राचेवाड यांचे अभिनंदन करण्यात आले.

 यावेळी मुख्याध्यापक साईनाथ राचेवाड यांनी डिजिटल शाळेचे प्रझंटेशन दाखवले यावेळी डिजिटल शाळा पाहुन आनंद झाला ग्रामीण भागातील शाळा पाहून मन गहीवरले यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य संजयजी बेळगे,दिलीपराव पांढरे, सरपंच लक्ष्मण गायकवाड, उपसरपंच रमेश ओमगोंडा छप्पेवार, प्रा.हानमंत पटणे, संजय गंजगुडे, लघुळ चे माजी सरपंच, बाबुराव गोसलोड , हणमंतराव पटणे, भास्कर चव्हाण सर, कसलोड सर,हानमंत पटणे, शिवकुमार मिणके गणेश नामगोंडे शाळा व्यवस्था पण समीती, माणीक शिरगिरे, माधव पटणे, गंगाधर छप्पेवार यांची उपस्थिती होती.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या