व्हि पी के उद्योग समूहाच्या वतीने चार लाख मेट्रिक टन ऊस गाळप !

[ नायगाव बा.ता.प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
उमरी तालुक्यातील व्हीपीके गुळपावडर कारखाना प्रयागनगर सिंधी,वाघलवाडा येथील एमव्हीके साखर कारखाना व डाॅ.शंकरराव चव्हाण गुळपावडर आधी तिन कारखाना अंतर्गत गळीत हंगाम २०२३ ते २०२४ जानेवारी अखेर पर्यत चार लाख मेट्रिक टन ऊस गाळप यशस्वी रित्या केले असल्याची माहिती समुहाचे संस्थापक अध्यक्ष मारोतराव पाटील कवळे गुरूजी यांनी दिले.
त्यामुळे सर्व संचालक, सभासद, खाते प्रमुख, आधिकारी, कर्मचारी, ऊस उत्पादक शेतकरी ,वाहतूक ठेकेदार व आमचे सर्व हितचिंतकांचे मनापासून आभार व सर्वाना शुभेच्छा असे कवळे गुरूजी व्यक्त केले. व्हि पी के उद्योग समूहातील तिन्ही कारखान्याच्या वतीने माहे डिसेंबर आखेर पर्यन्त २५००/- रूपये प्रती टन एकरकमी दर देण्यात आला असून जानेवारी ०१ ते १५ तारखे पर्यंत एकरकमी २५५०/- रू आणि १५ ते ३१ जानेवारी पर्यंत २६००/- रू प्रती टन (प्रती पंधरवाडा पन्नास रुपये वाढ प्रमाणे)एकरकमी दर देण्याचे ठरवले आहे त्यासोबतच फेब्रुवारी आखेर पर्यंत गाळपास आलेल्या ऊसास २७००/- रू प्रती टन तर मार्च अखेर पर्यंत ऊस गाळपासाठी आल्यास एकरकमी २८००/- रू प्रती टन भाव देण्याचे उद्योग समूहाच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे त्यामुळे कार्यक्षेत्रातील शेतकरी बांधवांनी ऊस तोडणीसाठी घाई न करता आपला ऊस राखून ठेऊन उच्चांकी भाव मिळवून आपली आर्थिक उन्नती साधावी.ऊस उत्पादक शेतक-यांना ऊस पिकाला दर्जेदार भाव उद्योग समूहाच्या वतीने मिळत असल्याने शेतक-यांनी मोठ्याप्रमाणात ऊस लागवड करावे.जेणेकरुन ज्या शेतक-यांला नवीन ऊस लागवड कराव्याचे झाले असल्यास कारखान्याच्या ऊस विकास योजने अंतर्गत ऊस रोप व बेणे घेऊन लागवड करावी.असे कवळे गुरूजी यांनी सांगितले.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या