वाघलवाडा कारखान्याचे आठ तारखेला बाॅयलर पेटणार !

उमरी ..
भागातील तरुण सुशिक्षित बेरोजगार युवक व शेतकरी भागातील व्यापार पेठ वाढली पाहिजे असे व्हीपीके उद्योग समुहाचे चेअरमन मारोतराव कवळे गुरूजी यांनी भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना कडुन रितसर वाघलवाडा साखर कारखाना खरेदी करून घेतले आले.

सदर कारखाना वेळेत चालु करण्यासाठी चेअरमन व येथील सर्व कर्मचारी दिवसराञ मेहनत घेत आहेत. तसेच परिसरात ऊस लागवड वाढविण्यासाठी येथील कर्मचारी टिम व चेअरमन मारोतराव कवळे गुरूजी यांनी गावोगाव शेतक-यांच्या गाठीभेटी घेत आहेत.

इसन २०२० ते २०२१ मध्ये या एम,व्ही,कै,अॅग्रो फुड प्राडक्ट कुसूमनगर वाघलवाडा कारखाना अंतर्गत दोन लाख पन्नास हजारांच्या वर मॅट्रीक टन ऊस गाळपाच्ये उद्दिष्ट आहे असे चेअरमन मारोतराव कवळे गुरूजी यांनी सांगितले आहे. या साखर कारखाना वाघलवाडा येथे सर्पुंण कर्मचारी स्टाॅप ही तातडीने भरण्यात आले आहे.

तालुक्यात आता सिंधी येथील गुळपावडर कारखाना व वाघलवाडा कारखाना तसेच सिंधी येथील साईकृपा दुध डेरी तसेच कवळे पंतस्था सह नुकतेच स्वराज्य कंपनीचे टॅक्टर एजन्सी घेतल्याने जवळ पास दोन ते तीन हजार सुशिक्षित बेरोजगार युवकांच्या हाताला रोजगार मिळाला आहे.

तर शेतक-यांसाठी ऊस पिक हमी तोड होईल असा विश्वास झाला तर व्यापार पेठ साठी व्यापारी ही भागात वाढेल यासाठी व्यापारी वर्गात नवचैतन्य निर्माण झाली आहे हे सर्व कामधेनु भागात कवळे गुरूजी च्या रुपाने फायदाचे ठरले आहे. असेही परिसरात प्रत्येकाच्या तोंडुन ऐकावयास मिळत आहे.

कार्यक्षेत्रातील व कार्यक्षैञाच्या बाहेरील ऊस उत्पादक शेतक-यांचा ऊस नोंदणी प्रमाणे वेळेत आणण्यासाठी तोंड वाहतुक यंञणा ऊभी केली आहे.

या यंञणासाठी जवळ पास साडे दहा कोटी अनामत रक्कम तोड वाहतुक ठेकेदार यांना देण्यात आले आहे. सदर सिंधी येथील गुळपावडर कारखाना व वाघलवाडा येथील साखर कारखाना सुरळीत चालवण्यासाठी जिल्हाचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी माझ्या वर विश्वास टाकून सदर कारखाना दिले असुन उमरी, धर्माबाद, भोकर, कंधार,नायगाव, बिलोली आधी तालुक्यातील ऊस उत्पादक शेतक-यांना हमी ऊस पिंकाकडे वळुन आर्थिक बाजु भक्कम करण्यासाठी आमची टिम अहोरात्र मेहनत घेत आहेत. असे ही कवळे गुरूजी बोलतांना सांगितले.

शेतक-यांचा परिपक्व ऊस गाळपाला आले तर एफारफी वाढ झाले तर त्यानुसार ऊसाचे दर भाव वाढ देता येईल त्यासाठी ऊस उत्पादक शेतक-यांनी आपला ऊस पुर्ण पणे तारखेनुसार ऊसाला टोळ्या टाकले जातील. इतर कारखान्यापेक्षा दर्जेदार वाढ दिले जाईल असे चेअरमन मारोतराव कवळे गुरूजी सांगितले आहे.

ताज्या बातम्या