नांदेड जिल्ह्यात निर्माण झालेल्या व्हीपीके बँकेचे नांव चांदा ते बांदा पर्यंत पोहचलयं !

लोणावळा येथे बँको ब्लू 2024 ह्या पुरस्कारांने चेअरमन मारोतराव कवळे गुरुजी यांना सन्मानित केले.
[ नायगाव बा. ता. प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
स्व. डॉ. शंकरराव चव्हाण व कै श्यामरावजी कदम साहेब,यांनी या नांदेड जिल्हात पूर्वीच्या कार्यकाळात सहकार वाढविला पण आज त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत व्हीपीके पतसंस्थेचे चेअरमन मा मारोतराव व्यंकटराव पाटील कवळे गुरुजी यांनी सहकार कसा असतो त्याला जिवंत ठेवण्याच काम करताना दिसत आहे कवळे गुरुजी यांचा जन्म सिंधी तालुका उमरी जिल्हा नांदेड येथे दिनांक 01/01/1966 ला एका सामान्य शेतकरी कुटुंबात झाला. त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अवघ्या 56 हजार 500 पाचशे इतक्या छोट्या रकमेच्या शेअर्सपासून 2002 साली उभी केलेली हीच ती पतसंस्था कै व्यंकटराव पाटील कवळे बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित सिंधी..
मराठवाड्यासारख्या कोरडवाहु शेती असलेल्या दुष्काळी भागात शेतीच्या पिकातून फारसे उत्पन्न मिळत नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या नशिबी कर्जबाजारी पणा येतो आणि आत्महत्येला सामोरे जावे लागते, मारोतराव कवळे गुरुजी यांच्या मनावर खूप खोलवर परिणाम झाला यातून मार्ग काढण्यासाठी एखादा जोडधंदा शेतकऱ्याकडे असल्यास त्यांच्यावर उपासमारीची वेळ येणार नाही या हेतूने त्यांनी साईकृपा दूध डेरी ची स्थापना केली पतसंस्थेच्या मार्फत लोकांना लवकर कर्ज उपलब्ध व्हायला लागले त्यामुळे लोकांनी मोठ्या प्रमाणात गाई म्हशीची खरेदी केली दुग्ध व्यवसायाला चांगलीच संधी निर्माण करून दिली या पतसंस्थेमार्फत अनेक महिला बचत गटांना कर्ज देऊन त्यांना उद्योग सुरू करायला प्रोत्साहित केले तरुणांना कोल्हापूर व पुणे येथे दुग्ध व ऊस विकासावर प्रशिक्षणासाठी पाठवले जाते प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांना कर्ज देऊन व्यवसाय सुरू करण्यास प्रोत्साहन दिले जाते अनेक तरुणांना किराणा कापड आडत इत्यादी धंदा करण्यासाठी अनेक बाबीसाठी पतसंस्थे कडून कर्ज उपलब्ध करून दिल्या जाते या कर्जामुळे अनेक तरुण परिसरातील स्वतःच्या पायावर उभे राहून सन्मानाचे जीवन जगत आहेत..
पतसंस्थेने आतापर्यंत जिल्ह्यात 20 शाखाचे जाळे निर्माण केले आहे पतसंस्थेने छप्पन हजार पाचशे रुपयांनी केलेली सुरुवात आज घडीला साडेतीनशे कोटी रुपयावर गेली आहे वार्षिक उलाढाल पाचशे कोटी रुपयावर पोहोचले आहे ज्यांच्याकडे बचतीचा पैसा आहे ते लोक या पतसंस्थेत गुंतवणूक करतात व जे गरीब आहेत ते कर्ज घेऊन उद्योग धंदा सुरू केली आहे असे कवळे गुरुजी यांनी सांगितले.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या