आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेची महत्त्वाची बैठक संपन्न.

 आम्ही वारकरी परिवार सेवा भावी संस्था महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष मा.ह.भ.प.राम महाराज पांगरेकर यांच्या अध्यक्षतेखाली सर्व आघाडी पदाधिकारी यांची नांदेड येथे बैठक घेऊन पंढरपुर येथे वारकऱ्यांच्या धर्मशाळेच्या जागा खरेदी करण्याचा ठराव सर्वानुमते पारित..!

[ नायगाव बा.ता. प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
आम्ही वारकरी परिवार सेवा भावी संस्था महाराष्ट्र जिल्हा नादेड ची बैठक दतकृपा मंगल कार्यालय हडको नांदेड येथे दि.२२ में २०२४ रोजी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.हभप.राम महाराज पांगरेकर यांच्या अध्यक्षतेखाली राज्य कार्यकारिणी जिल्हातील सर्व आघाडी कार्यकारणी पदाधिकारी यांची नांदेड येथे महत्वाची बैठक घेण्यात आली.
     या बैठकीत सर्व पदाधिकारी यांना पुष्प गुच्छ देऊन सर्वांचा सन्मान करण्यात आला. व महत्त्व पुर्ण विषयावर चर्चा करण्यात आली. प्रथमतः प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष राम महाराज यांनी बैठकीत चर्चा करण्यासाठी विषय दिले.
१) संस्थेच्या वतीने पंढरपूर येथे संस्थेची धर्मशाळा व्हावी या संकल्पनेतून आपण जनसामान्यांच्या सहकार्याने निधी संकल्न केला आहे त्या निधीचा लेखाजोखा हिशोब सादर करावा.
२) आपल्या संस्थेच्या वतीने दरवर्षी प्रमाणे ‘घर तिथे ज्ञानेश्वरी’ पारायण सोहळा ५ आॅगस्ट २०२४ ते ९ सप्टेंबर २०२४ या कलावधीत पारायण सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी लागणारे पारायण प्रती ग्रंथ मागणी यावर चर्चा करावी.
३) पंढरपुर येथे धर्मशाळेसाठी पंढरपूर शहरात मंदिराच्या जवळ किंवा बाहेर जागा घ्यावी याबद्दल चर्चा करावी.
४) जागा घेण्यासाठी कधी मुहुर्त काढावा जागेची पुर्ण रक्कम जमा होण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करून रजिस्ट्रिसाठी मुद्दत घेऊन सौदाचिठी करावी यावर चर्चा करावी.
अध्यक्षांनी दिलेल्या या चार विषयावर अनेक पदाधिकाऱ्यांनी आपले विचार व्यक्त केले. निधी संकल्पनांचा हिशोब झाला त्यात संस्थेच्या खात्यात दहा लाख रू.जमा व पदाधिकारी मंडळी कडून आज रोजी चार लाख रुपये असे एकूण संस्थेकडे चौदा लाख रुपये जमा झाले.या पैशातून पंढरपूर येथे दि.२६ में रोजी जागा पाहणी केलेल्या पैकी एका जागेचा सौदा चिठ्ठी करावी व रजिस्ट्रिसाठी दोन महिन्यांची मुद्दत घेण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला दि.२५ में २०२४ रोजी पदाधिकाऱ्यांनी आपल्या स्वखर्चाने पंढरपुरात जाण्याचा व दि.२६ में २०२४ रोजी जागेचा सौदाचिठी करण्याचा निर्णय झाला. वरील चार हि विषयावर सविस्तर चर्चा करून सर्वानुमते निर्णय घेण्यात आला.
     या बैठकीसाठी दतकृपा मंगल कार्यालयाची जागा हडको चे श्री मोहनराव पाटिल घोगरे यांनी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे संस्थेच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.
 संस्थेचे सचिव व्यंकटराव जाधव माळकौठेकर यांनी सर्वांचे आभार मानले. या बैठकीत संस्थापक अध्यक्ष हभप गुरूवर्य राम महाराज पांगरेकर, अनेक प्रमुख मान्यवर संस्थेचे मार्गदर्शक रावसाहेब पाटील शिराळे, दतराम पा.येडके, संस्थेचे सहसचिव प्रभाकर पुय्यड,सचिव व्यंकटराव जाधव माळकौठेकर, रामजी पा.शिदे माळकौठेकर, जिल्हाप्रसिध्दि प्रमुख चंपतराव डाकोरे पाटिल, राजेश्वर पा. गागलेगावकर, अनिल पाटील शिंदे नागनाथ पा. देवकते प्रभाकर पा. पवळे, सचिन लाठकर ,बाळू पाटील धुमाळ, बाळू पाटील देवकते, प्रवीण महाराज पारडीकर, श्री धोडीबा गाढे, श्री व्यकटराव पा. येळेगावकर, सौ अनिताताई, सौ कुसुमताई शिंदे, भाग्यश्रीताई कदम, ञिमुख यडके, श्री भगवान पा.रहाटीकर, बालाजी पवार, सोपान गिरे, शिवाजीराव पांगरेकर, सतीश पानचावरे, राज्यकार्यकारिणी, जिल्हा कार्यकारिणी, प्रसिध्दी कार्यकारणी, मल्टिमीडिया कार्यकारणी, महिला आघाडी, तालुका कार्यकारिणी इत्यादी मान्यवरांच्या भाविक भक्ताच्या उपस्थितीत बैठकित सर्वांचे आभार संस्थेचे सचिव व्यंकटराव जाधव यांनी मांडले.
 असे प्रसिध्दीपत्रक जिल्हाप्रसिध्दी प्रमुख चंपतराव डाकोरे पाटिल.व रामप्रसाद चन्नावार नायगाव यांनी दिले आहे.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या