शहापुरवाडी ता.अर्धापुर येथे आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था शाखा बोर्डचे अनावरण व अर्धापुर तालुक्यातील सोळा शाखा नियुक्तीपत्र वितरण सोहळा थाटात संपन्न.

[ नायगाव बा.ता.प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
अर्धापुर तालुक्यातील शहापुरवाडी येथे आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य शाखा बोर्डाचे अनावरण व तालुक्यातील सोळा शाखा, कार्यकारिणीची निवड व नियुक्तीपत्र वितरण सोहळा दि.२८ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता मोठ्या उत्साहात भक्तिमय वातावरणात, नामघोषेत बोर्डाचे अनावरण संस्थापक अध्यक्ष हभप गुरूवर्य राम महाराज पांगरगेकर व कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन संस्थेचे मार्गदर्शक रावसाहेब पाटील शिराळे, श्रीरामजी पाटील शिंदे, व्यंकटराव पाटील कपाटे, श्री दत्तराम पाटील एडके,सल्लागार श्री शिवाजी पांगरेकर,श्री बालाजी पा.जाधव, उपाध्यक्ष -गंगाधर हंबर्डे, सचिव -व्यंकटराव माळकौठेकर, सहसचिव -प्रभाकर पा. पुयड कोषाध्यक्ष -शिवाजी मदमवाड वडगावकर जिल्हा प्रसिध्दि प्रमुख चंपतराव डाकोरे पाटील, जिल्हा प्रसिद्धी उपप्रमुख अशोक वाघमारे ,जिल्हा प्रसिद्धी कोष्यध्यक्ष रामप्रसाद चन्नावार नायगाव तालुका प्रसिद्धी प्रमुख गजानन चौधरी, अर्धापुर ता. अध्यक्ष मुंजाजी पवार, उप अ कैलास जाधव, सुदामा कपाटे, व्यंकटराव कदम, गजानन कल्याणकर, ऊषा पांचाळ, धुरपता पवार, संगिता पवार सर्व पदाधिकारी तसेच सर्व शाखा पदाधिकारी ऊपस्थित होते.

      प्रथम दिपप्रज्वलन करुन साधुसंत, प्रमुख मान्यवराचे शाल श्रीफळने सत्कार करण्यात आला. संस्थेचे संस्थापक/अध्यक्ष गुरुवर्य ह.भ. प. श्री राम महाराज पांगरेकर यांच्या शुभहस्ते अर्धापुर तालुक्यातील सर्व आघाडीतील कार्यकारणी सोळा शाखा कार्यकारीणी पदाधिकारी याना नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक ता.अध्यक्ष मुंजाजी धुमाळ यांनी केले. सुत्रसंचलन साबळे महाराज यांनी केले. प्रमुख पाहुणे प्रभाकर महाराज पुय्यड,चंपतराव डाकोरे, शिवाजीराव पांगरेकर ,ईत्यादीने आपले धार्मिक कार्याबदल माहिती दिली.
           संस्थापक अध्यक्ष हभप प.पुज्य गुरूवर्य श्रीराम महाराज पांगरेकर यांच्या रसाळ ज्ञानामृत वाणीतून आम्ही वारकरी परिवार ही संकल्पना स्पष्टपणे मांडली.. त्यांनी त्यांच्या मनोगतात ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण करताना फक्त बेचाळीस साधकांना घेऊन सुरू केले ते सहा वर्षांत सहा हजार सातशे पन्नास साधक जोडले गेले तर येणाऱ्या श्रावण महिन्यात जेवढ्या ज्ञानेश्वरीच्या ओवा तेवढे साधक करण्याचा संकल्प केला तसेच पंढरपूर येथे आम्ही वारकरी परिवाराची धर्मशाळेबद्दल माहिती या कार्यक्रमात दिली.त्याच वेळा दानशुर महिला मीराबाई मुंजाजी पवार यांनी भुमीदानासाठि पन्नास हजारांची देणगी दिलि. सर्व भाविक भक्तांनी धर्माच्या रक्षणासाठी 
आपल्या जीवनात अमुलाग्र बदल करून घेण्यासाठी संतसंग हाच खरा मार्ग आहे..जीवनामध्ये धार्मिक कार्य करण्यासाठी ज्ञानभक्तीची वृध्दी करून जीवन सुखकर करण्यासाठी भक्तिमार्ग फार महत्त्वाचा आहे.
धार्मिक वातावरण शुध्दीकरण करण्यासाठी गाव तिथे शाखा स्थापन करून दुषित वातावरण शुध्दीकरण करण्यासाठी आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेत सहभागी होण्याचे अव्हाहन हभप राम महाराज पांगरगेकर यांनी केले.
 या कार्यक्रमात जिल्ह्यातील व तालुक्यातील सर्व आघाडी मुख्य आघाडी, प्रसिद्धी आघाडी, महिला आघाडी, युवक आघाडी, साधुसंत, भाविक भक्त मंडळी हजारोंच्या संख्येनी भक्तानी महाप्रसादाचा लाभ घेतला.
कार्यक्रम यशस्वितेसाठी ता अर्धापुर तालुका अध्यक्ष  बालाजी पवार, शहापुरवाडी चेअरमन, सरपंच, साहेबराव पवार, मारोती पवार, गुलाब पवार, मिराबाई धुमाळ, मिनाबाई पवार, रामेश्वर धुमाळ,आकाश धुमाळ,सचिन पांचाळ,प्रभु पवार राजु पवार,किशोर धुमाळ,आनंदराव धुमाळ, ईत्यादीने परिश्रम घेतले अशी प्रसिध्दीपत्रक जिल्हा प्रसिध्दि प्रमुख चंपतराव डाक़ोरे व रामप्रसाद चन्नावार यांनी दिली आहे.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या