राजेश साहेब कुंटूरकर यांच्या हस्ते कुंटूर येथे पाणी पुरवठा वाहिनीचे उद्घाटन !

[ कुंटुर प्रतिनिधी – बालाजी हनमंते ]
नायगाव तालुक्यातील कुंटूर येथील कुंटूर ग्राम पंचायत पाणी पुरवठा करणारी नविन वाहिनी टाकण्याचा शुभारंभ कुंटूर परीसरातील कुंटूरकर शुगर अँन्ड प्रा. लिमिटेड साखर कारखान्याचे चेअरमन मा.राजेश गंगाधरराव देशमुख  यांच्या हस्ते आणि मा.सरपंच रुपेशजी देशमुख कुंटूरकर यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

कुंटुर परिसरात आयोजित केलेल्या एका समारंभात मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते श्रीफळ फोडून हा शुभारंभ करण्यात आला. कुंटुर येथील लोकसंख्या लक्षात घेता भाग मोठ्या प्रमाणात विकसित होत असल्याने आणि या भागातील नागरिकांची पाण्यासाठीची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने नविन आठ ईंची पाईप लाईन या जल जीवन मिशन अंतर्गत (एच डी पी ) पाणी पुरवठा विभागातर्फे ही सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी सरकारने पावले उचलली होती. या कामासाठी लाख रुपये खर्चाची निविदा काढण्यात आलेली आहे. हे काम पूर्ण झाल्यावर कुंटुर येथील कुंटूर तांडा सभोवतालच्या परिसरातील नागरिकांना त्याचा लाभ होणार आहे.
याप्रसंगी कुंटूर शिवाजी महाराज चौक परिसरात झालेल्या एका कार्यक्रमात बोलाताना राजेश गंगाधरराव देशमुख कुंटूरकर म्हणाले की, काही गावातील ग्राम पंचायत कर्मचार्‍यांनी यांच्या निष्क्रियतेमुळे मज्जीद भागातीला रहिवाशांना गेली दोन वर्षे पाण्यापासून वंचित रहावे लागले. आणि भविष्यात नागरिकांवर अशी वेळ येऊ देणार नाही असे सांगितले व मंजूर झालेली जुन्या जागी टाकी साठ हजार लीटर ची होती ती टाकी एक लाख लीटर मंजुरी आली आहे. 
यावेळी उपसरपंच शिवाजी पा.होळकर, लक्ष्मण पा.आडकीने बालाजी पवार, राम पा. आडकीने, दतु नालीकंटे, इमामसाब कल्यापुरे, सुधाकर झुंजारे, माधवराव डोके, मुलतान सेठ, रज्जाक गुजिवाले  तसेच गुत्तेदार साजित काझी साहेब यांची भाषणे झाली. त्यांनी बोलताना सांगितले की, आपली ग्राम पंचायत सुरळीत चालण्यासाठी आपन वेळेवर घर पट्टी, नळ पट्टी, इतर कर भरुन सहकार्य करावे. आपल्या नळाला तोठी बसवुन पानी बचत करावे. यांनी उपस्थितांना कामाची माहिती दिली. 
व गावातील मोहन महादाळे मॅनेजर, महेबूब शेख, गणेश पाटील जाधव, मोहन होळकर, उस्मान शेख, पत्रकार बालाजी हनमंते आदी व्यासपीठावर उपस्थित होते. सुरूवातीस कुंटूर ग्राम पंचायत चे ग्रामविकास अधिकारी यरसनवार यांनी सर्वांचे स्वागत करुन आपले मनोगत व्यक्त केले. विनोद झुंजारे यांनी या कार्यक्रमाचे सुत्र संचलन केले तर यरसनवार यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमास कुंटुर येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या