रायगड जिल्ह्यातील वाशी, शिरकी, उंबर्डे भागातील पाण्याचा प्रश्न कायम स्वरूपी निकाली.

[ अलिबाग प्रतिनिधी:- अभिप्राव पाटील ]
रायगड जिल्ह्यातील वाशी,शिरकी,उंबर्डे भागातील पाण्याचा प्रश्न कायम स्वरूपी निकाली निघावा या बाबत शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख तथा आमदार श्री.महेंद्र शेठ दळवी साहेब यांनी महाराष्ट्र राज्याचे पाणी पुरवठा मंत्री सन्माननीय नाम.गुलाबराव पाटील साहेब यांच्याकडे सातत्याने पाठपुरवठा केला.

या मागणीला मंगळवार दिनांक.11.01.2022 रोजी खऱ्या अर्थाने यश आले. या सर्व विभागाच्या पाणी वितरण व्यवस्थे साठी पंचवीस कोटी आठ्याऐंशी लाख रुपयांची महाराष्ट्र शासनाची योजना मंजूर झाली. आज या योजनेच्या प्रशासकीय मान्यतेच पत्र मंत्री श्री.गुलाबराव पाटील यांच्या हस्ते जिल्हा प्रमुख तथा आमदार महेंद्र दळवी साहेब यांनी स्विकारले.

यावेळी पाणी पुरवठा खात्याचे राज्यमंत्री, उपजिल्हा प्रमुख अविनाश म्हात्रे, तालुका प्रमुख तुषार माणकवले, माजी उपजिल्हा प्रमुख अनंत पाटील, पोटफोडे मॅडम, संजय पाटील, नंदू मोकल, अशोक वर्तक, राजेश पाटील व इतर उपस्थित होते.

सदरची योजना एप्रिल, मे पर्यंत पूर्ण होण्याचे संकेत मिळाले आहेत. लवकरच या योजनेच्या कामाला वाशी हरिजन वाडा ते वढाव आणि वढाव ते भाल आणि वडखळ ते शिरकी आणि शिरकी ते शिरकी चाळ या योजनेच्या पाणी वितरण व्यवस्थेच्या कामाला सुरुवात होत आहे.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या