सामाजिक परिवर्तनाचा पाया रचला गुरुजीने आईच्या मृत्यूनंतर तेरवी टाळून शाळेला दिले 65 हजाराचे वॉटर फिल्टर

[ कुंटुर प्रतिनिधी – बालाजी हनमंते ]
नायगाव तालुक्यातील कुंटूर परीसरातील मौजे सातेगाव येथील कै.कमलबाई किशनराव जाधव यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा असलेले विलास किशनराव पाटील जाधव सहशिक्षक यांनी सामाजिक परिवर्तनाचा पाया रचण्याचे काम स्वतःपासून सुरू केले आहे.. बालपणापासूनच विलास गुरुजींना सामाजिक परिवर्तनाची ओढ आहे .ते नेहमीच गावातील तसेच नोकरीच्या गावातील सामाजिक उपक्रमांमध्ये भाग घेत असतात.

सोबतच परिवर्तनातवादी विचार युवकांसमोर ठेवण्याचे काम नेहमी करत असतात. याचाच एक भाग म्हणून कै.कमलबाई किशनराव जाधव(आई) यांच्या मृत्यूनंतर प्रथेप्रमाणे असणारा तेरवीचा कार्यक्रम टाळून त्यांनी आपल्या गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस नगदी स्वरूपात 65 हजार रुपयांची मदत दिलेली आहे. यातून शाळेतील विद्यार्थ्यांसाठी वॉटर फिल्टर च्या रूपाने शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे. यासोबतच लागणारे टीन शेड आणि प्रतिवर्षी येणारा दुरुस्ती खर्च ग्रामपंचायत मार्फत करण्यात येणार आहे.यामुळे परिसरातील नागरिकांतून तसेच शिक्षक वर्गातून त्यांचे कौतुक व अभिनंदन होत आहे.सोबतच सर्व विद्यार्थ्यांनी त्यांचे आभार मानले. आपण राखलेले सामाजिक भान हे निश्चितच दुसऱ्यांसाठी प्रेरणादायी आहे आणि आमच्या गावासाठी हा एक आदर्श उपक्रम श्री विलास किशनराव जाधव यांनी राबवून निश्चितच सामाजिक परिवर्तनाचा पायाच रचला आहे,अशा प्रतिक्रिया गावकऱ्यांकडून व्यक्त होत आहेत.
तसेच दप्तर मुक्त शाळा उपक्रमांतर्गत शाळेमध्ये आज माननीय प्राध्यापक डॉक्टर श्री मारुती नारायणराव दगडूमवार अर्थात प्राध्यापक बाळू दुगडूमवार सर यांची प्रकट मुलाखत आयोजित करण्यात आली होती. ही मुलाखत सर्व गावकऱ्यांसमोर शाळेतील इयत्ता सातवीचे विद्यार्थी आदर्श गौतम जोंधळे व अदिती संतोष लंगोटे यांनी घेतली. ही मुलाखत ऐकून गावकरी अतिशय आनंदी झाले आणि विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे कौतुक केले.
तसेच शाळेमध्ये आज प्रजासत्ताक दिनानिमित्त झालेल्या क्रीडा स्पर्धाबद्दल बक्षीस वितरणाचा ही कार्यक्रम घेण्यात आला. विद्यार्थ्यांना विविध प्रकारची बक्षिसे देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले. याप्रसंगी परिसरातील प्रसिद्ध साहित्यिक प्राध्यापक डॉ. बाळू दुगडूमवार सर,गावातील प्रथम नागरिक सौ.निलूबाई गोविंद पामलवाड, उपसरपंच प्रतिनिधी श्री परमेश्वर जाधव, सौ.सुरेखा जाधव ग्रामपंचायत सदस्या ,श्री नामदेव जाधव,श्री शंकर जाधव ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक श्री नागेश येरसनवार साहेब, श्री प्रकाश व्यंकटराव जाधव, श्री पांडुरंग शेषराव जाधव, श्री बालाजी जयराम जाधव शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष,श्री संतोष अशोक लंगोटे, श्री अशोक रावसाहेब जाधव, श्री यदुराज भुजंगा जाधव,श्री संजय व्यंकटराव जाधव, श्री परशुराम लंगोटे पोलीस पाटील, श्री व्यंकटराव लंगोटे, श्री तिरुपती जाधव,श्री शिवाजी जाधव, श्री बाबुराव जाधव तंटामुक्ती अध्यक्ष श्री संदीप जाधव श्री सुभाष जाधव श्री नागोराव गायकवाड श्री कोंडीबा जाधव श्री नारायण जाधव श्री काशिनाथ जाधव श्री जयवंत जाधव, श्री दत्ता गायकवाड श्री नामदेव जाधव श्री हरी जाधव श्री किशन जाधव श्री वसंत जाधव इत्यादी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच शाळेला जलशुद्धीकरण यंत्र दिल्याबद्दल शालेय व्यवस्थापन समिती व शाळेच्या वतीने श्री विलासराव किशनराव जाधव सर यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री स्वामी सर, सहशिक्षक श्री शिंदे सर, श्री डांगे सर,श्री मच्छेवार सर,श्री जमदडे सर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री देविदास जमदडे सर यांनी केले तर आभार मुख्याध्यापक श्री स्वामी सर यांनी मानले. अशा पद्धतीने शाळेमध्ये मोठ्या उत्साहाने कार्यक्रम पार पडला.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या