जलशुद्धीकरण केंद्र नावालाच; पालिकेकडून अशुद्ध पाणीपुरवठा,जनतेचे आरोग्य धोक्यात!

(विशेष प्रतिनिधी/ रियाज पठान)
लोहा शहरात नगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून होणारा पाणी पुरवठा अशुद्ध स्वरूपात होत असल्याचे वास्तव समोर आले आहे. लोहा नगरपालिकेकडून चालविले जाणारे जलशुद्धीकरण केंद्र परिसरामध्ये काटेरी झुडूप व घाणीचे साम्राज्य जलशुद्धीकरण केवळ शोभेची वास्तू बनली आहे.
जलशुद्धीकरण केंद्राद्वारे पाण्याचे शुद्धीकरण केलेच जात नाही तर सुनेगाव तलावातून आलेले पाणी त्यात केवळ अ‍ॅलम मिसळवून टाकीत भरून तेच अशुद्ध पाणी नळाद्वारे शहरातील नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचत आहे.
अगोदरच कोरोनामुळे शहरवासीय हैराण झालेले आहेत. आरोग्याशी जणू खेळच मांडला कि काय?असा सवाल शहरवासीय करत आहेत.एवढ्या मोठ्या शहरात अंदाजे पंचवीस हजाराच्या वर लोकसंख्या असून प्रति व्यक्ती दोन दिवसाआड सत्तर लिटर पाणी दिले जाते.नगरपालिका प्रशासनाच्या वतीने पाणी जलशुद्धीकरणासाठी लाखो रुपये खर्च केले जातात मग शहराचं नशिबाला अशुद्ध पाणी का ? असा आरोप होत आहे. असे असले तरी शहरवासीयांकडून पाणीकर वसुली व्याजासह केली जात असल्याने नागरिकांमध्ये पालिका प्रशासनाप्रती संताप व्यक्त केला जात आहे.
शहरातील प्रत्येक नागरिकाला त्याच्या दैैनंदिन उपयोगाएवढे पाणी पुरविणे हे नगरपरिषदेचे कर्तव्य आहे. पुरविलेले पाणी नागरिकांच्या आरोग्याला अपायकारक नसावे, हेसुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे.त्यासाठी पालिका नागरिकांकडून पाणी कराच्या स्वरूपात कर घेते. कोरोना काळातही पालिका प्रशासनाने पाणी,घरपट्टी सक्तीची वसुली सुरूच आहे.पालिकेने पाणी शुद्धीकरण करून पाण्याचा पुरवठा करणे अपेक्षित आहे. मात्र गेल्या कित्येक दिवसांपासून नळाला येणाऱ्या पाण्याला दुर्गंधीही येत असल्याचे शहरवासीय सांगत आहेत.

ताज्या बातम्या