कुंडलवाडी शहरातील पाणीपुरवठा सुरळीत ; पाईपलाईन फुटल्याने पाणीपुरवठा होता बंद !

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
             येथील शहराला शेळगाव येथील गोदावरी नदीपात्रातून पाणीपुरवठा केला जातो,पण गेल्या काही दिवसापूर्वी शेळगाव जवळील पाईपलाईन फुटल्याने शहरात पाणीटंचाई निर्माण झाली होती. नगरपालिका प्रशासनाने फुटलेली पाईपलाईन दुरुस्ती करून शहरात सुरळीत पाणीपुरवठा केला जात असल्याची माहिती प्रभारी मुख्याधिकारी आर.जी.चौहाण यांनी दिली आहे.  

             कुंडलवाडी नगरपरिषदे कडून तीन किमी अंतरावर असलेल्या शेळगाव येथील गोदावरी नदीपात्रातून शहरास पाणीपुरवठा केला जातो,सदरील पाईप लाईन ही 1998च्या योजनेतील असल्यामुळे संपूर्ण पाईप लाईन जीर्ण झाली आहे त्यामुळे गेल्या काही दिवसापासून शहरातील पाणीपुरवठ्याची पाईपलाईन सतत फुटत आहे. तसेच हेअर वॉल हि नादुरुस्त असल्यामुळे शहरातील नागरिकांना काही दिवस तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागले आहे.
  अशा या गंभीर बाबीकडे नगरपरिषद प्रशासनाने लक्ष देत फुटलेली पाईपलाईन दुरुस्ती केली आहे तर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईप लाईनला शेळगाव येथील नागरिकांनी हेअर वॉलला नळाचे पाईप लावून चोवीस तास पाणी पुरवठा करून घेत होते,ही बाब नगरपालिका प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर सदरील पाईपलाईन वरील हेअर वॉल व नळ तात्काळ बंद केले,असे असले तरी गोदावरी नदीपात्रापासून ते शहरातील टाकी पर्यंत सर्व पाईप लाईन जीर्ण झाल्यामुळे हेअर वॉल लिकेज सोडले नाही तर पाईप लाईन फुटण्याची शक्यता जास्त आहे,त्यामुळे शेळगाव येथे हेअर वॉल लिकेज सॊडावे लागते अशी माहिती समोर येत आहे तर शहरात सुरळीत पाणीपुरवठा केल्या जात असल्याची माहिती प्रभारी मुख्याधिकारी आर जी चौहाण,नगरपालिका पाणी पुरवठा अधिकारी सुभाष निरावार यांनी दिली आहे.

● प्रतिक्रिया2

   ” शहरास पाणीपुरवठा करणारी पाईप लाईन हि जुनी असल्यामुळे सतत पाईप लाईन लिकेज होत आहे,लिकेज पाईप लाईन दुरुस्ती करून शेळगाव येथील लिकेज हेअर वॉलही बंद केले आहे आता शहरात सुरळीत पाणी पुरवठा होत आहे…  
 [ सुभाष निरावार – पाणी पुरवठा अधिकारी कुंडलवाडी ]
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या