राज्याच्या महसूलमंत्र्यांना तहसीलदारांमार्फत सामाजिक कार्यकर्ते – शिवानंद पांचाळ नायगांवकर यांनी स्मरणपत्राद्वारे आंदोलनाचा तिव्र इशारा दिला आहे, शेती उद्योगातील बलुत्यावर आधारित सुतार – लोहाराना नागरी जमीन कायद्यातून शेत जमीन वाटप व्हावी बाबत तहसिलदारामार्फत राज्याच्या महसूलमंत्र्यांना निवेदनाद्वारे मागणी केली असता संबंधित कार्यालयाकडून कोणत्याही प्रकारे कार्यवाही न झाल्यामुळे पुन्हा तहसीलदारांमार्फत तिसरे स्मरणपत्र पाठवून आठवण करून वरील इशारा देण्यात आला आहे, छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना महाआघाडीने सुरू करून अठरा पगड जातीत बारा बलुतेदार उदरनिर्वाहात सक्षम व्हावा, बाराबलुतेदार सन्मान योजना सुरू करून गावगाड्याच्या कर्मात पिढ्यानपिढ्या शेकडो वर्षापासुन कार्यरत असलेल्यांना शेतकऱ्यांचे शेतीचे अवजारे, शेतकऱ्यांचे लाकडी लोंखडी कामाच्या सेवेत असलेल्या सुतार – लोहार समाजाला शेत जमिनी मिळाव्यात शिवानंद दत्तात्रय पांचाळ नायगांवकर निसर्गाच्या आसमानी संकटामुळे शेतकरी हतबल / बेजार झाला आहे , त्यांचा हाता तोंडाशी आलेल्या घास निसर्ग दर वर्षी हिसकावून घेत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना देखील आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे , त्यामध्ये शेतकरी पुर्णपणे कर्ज बाजारी झाला आहे , शेतकऱ्यांची आत्महत्या दिवसेंदिवस वाढत आहे, अश्यातच सुतार – लोहार समाजाकडे काम शिल्लक राहीले नाही , शेतकऱ्यांच्या बलुत्यावर गावातील लाकडी वस्तु तसेच लोंखडी कामावर अवलंबून असलेला वर्ग शहराकडे धाव घेत आहे, तिथे मिळेल ती मजुरी काम करत आहे, कला ,कुशल कौशल्य प्रावीण्य असलेला वर्ग अस्ताव्यस्त होऊन नष्ट होण्याच्या मार्गावर दिसून येत आहे , शासनाने नागरी जमीन ( कमाल धारणा व विनियोग ) अधिनियम १९७६ प्रमाणे १७ जानेवारी २०१८ चा मंत्रिमंडाळाच्या नियमाप्रमाणे ग्रामीण भागातील सुतार – लोहार जातींना शासनाची दोन हेक्टर जमीन उपलब्ध करून द्यावी तो ग्रामीण भागात शेतकरी व गाव गाड्यास लाकडी लोंखडी साहित्य पुरवू शकतो यातून हा वर्ग ग्रामीण भागात स्थिर राहू शकेल पूर्वीच्या शासनाने अश्या प्रकारच्या शेती वाटप केल्या आहेत ,नागरी जमीन कायद्या अंतर्गत सुतार – लोहार यांना शेती मिळावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते- शिवानंद दत्तात्रय पांचाळ नायगांवकर यांनी राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे तहसिलदारामार्फत दिलेल्या लेखी तिसऱ्या स्मरणपत्राद्वारे केली आहे , सदरील स्मरणपत्रात वरील मागणीच्या संदर्भात आवश्यक ती उचित कार्यवाही व्हावी या संदर्भात टाळाटाळ झाल्यास लोकशाही पद्धतीने राज्यभरात तिव्र आंदोलन करणार असा इशारा शिवानंद पांचाळ नायगांवकर यांनी दिला आहे.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. If you continue to use this site we will assume that you are happy with it.AcceptPrivacy policy