के.टी. कन्स्ट्रक्शन च्या संबंधित रस्त्यावर विना राॅयल्टी मुरुम टाकणाऱ्या वाहनावर दंडात्मक कार्यवाही करा – मुकींदर कुडके.

●●  के.टी.कंन्स्ट्रक्शन चे विना राॕयल्टी मुरुम टाकणारे वाहन कार्यवाहीसाठी महसुल विभागाच्या जाळ्यात. ●●

(बिलोली ता.प्र-सुनिल जेठे)
बिलोली तालुक्यात के.टी. कन्स्ट्रक्शन च्या माध्यमातून रस्ता करण्यात येत असलेल्या रस्त्यावर विना राॕयलटी शेकडो ब्रास मुरुम टाकले जात असलेले चित्र सामाजिक कार्यकर्ते व पञकारांना पहायला मिळताच जिल्हा महसुल प्रशासकीय अधिकाऱ्यांशी भ्रमण ध्वणीवर चर्चा करुन मुरुम भरलेले वाहनावर दंडात्मक कार्यवाही करण्यासाठी दि.२९ जुन रोजी बिलोली तहसिल दार यांच्या ताब्यात देण्यात आले.

सदरिल कुंडलवाडी, धर्माबाद डांबरीकरण करण्यासाठी के.टी.कन्स्ट्रक्शन मुरुम संबंधित ठेकेदाराने गेल्या एक वर्षभरापेक्षा अधिक काळापासुन सुलतानपूर शिवारातून मुरुमाची परवानगी जिल्हा कार्यालयाकडून घेऊन रस्त्यावर जात होते. परंतु कांही दिवसापुर्वी मुरुम परवानगी कालावधी काळ संपल्यावरही मुरुम संबंधित ठेकेदाराने बिनधास्त विना राॕयलटी शेकडो ब्रास मुरुम वाहनाद्वारे टाकले आहे.

अशी माहिती कांही सामाजिक कार्यकर्ते व पञकारांना चाहुल लागताच मुंकींदर कुडके यांनी आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन जिल्हा महसुल प्रशासणाला जागे करुन मुरुमाच्या वाहनांवर व रस्त्यासंबधित ठेकेदाराव दंडात्मक कार्यवाही व्हावी म्हणून सामाजिक कार्यकर्ते कुडके यांनी पुढाकार घेतला.
विना राॕयल्टी मुरुम भरलेले वाहन आढळुन आलेल्या घटनेपुर्वी व चार दिवसा आधी बावलगाव रस्ता क्र.११२ वर विना राॕयल्टी हायवा वाहनाद्वारे मुरुम टाकले होते. त्या दि.२४ जुन रोजी पञकार सुनिल जेठे व सामाजिक कार्यकर्ते नबाजी कुडके यांनी मुरुम टाकलेल्या वाहनाची विचारपूस केली असता वाहन चालकानी स्पष्ट राॕयल्टी नाही. आपच्या सुपरवायझरकडे आहे म्हणाले होते पण त्या सुपरवायझरकडून ही उडवा उडवीचे उत्तर ऐकायला मिळाले होते.
सदरिल के.टी.कंट्रेक्शन रस्त्याच्या संबंधित मुरुम ठेकेदाराने बिनधास्त विना परवानगी व विना राॅयल्टी मुरुम वाहन क्र.kA 56-5715 या वाहनावर महसुल प्रशासनाच्या नियमानुसार दंडात्मक कारवाई करावी, जेनेकरुन दुसरा कोणताही मुरुम धारक परवाना विना राॕयल्टी मुरुम वाहतूक करणार नाही असा जनतेतून सुर निघत होते.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या