महिला बचतगटाचे सक्षमीकरण होने गरजेचे आहे – कमलेश कोरपे (प्रे.सा.सं.म.अध्यक्ष )

[ रायगड/म्हसळा प्रतिनिधि – प्रा.अंगद कांबळे ]
ग्रुप ग्रामपंच्यात मांदाटने ता.म्हसळा येथे परसबाग निर्मिति व महिला बचत गट प्रशिक्षण कार्यक्रम ग्रुप ग्रामपंच्यात मांदाटने सरपंच श्री चंद्रकांत पवार यांच्या अध्यक्षते खाली पार पडला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन म्हसळा तहसीलचे तहसीलदार श्री समीर घारे उपस्थित होते.

मुंबई साहयक ट्रस्ट च्या वतीने अर्मेनिया फ्री व्हिजन (क्षयमुक्त ), ग्रामपंचायत प्राथमिक स्तरावर जनजागृति कार्यक्रम घेण्यात आला. या वेळी श्री अविनाश गायकवाड यांनी उत्कृष्टरित्या मार्गदर्शन केले. तसेच प्रेरणा सामाजिक संस्था महाड चे अध्यक्ष कमलेश कोरपे यांनी महिला बचत सक्षमीकरण व परसबाग संदर्भात मार्गदर्शन केले. म्हसळा तहसीलदार मा.श्री घारे यांनी घरातील पोषक आहार हे महिलांना, मुला, मुलींना किती पोषक आहे या बद्द्ल मार्गदर्शन केले. असे कार्यक्रम संपूर्ण तालुकाभर राबविण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी खामगाव सर्कल सलीम शाह, तलाठी शेळके, कलंबे तात्या, उपसरपंच शंकर गोरीवले स्नेहा पवार, व गांव महिला अध्यक्ष या कार्यक्रमास कृषी व पशु सभापती श्री बबन मनवे यांनी शुभेच्छा दिल्या.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या