राहेर येथे महानुभाव पंथाच्या पुजारिन ची हुस्सा येथील गावगुंडांनी केली छेडछाड व अश्लील चाळे !

354 प्रमाणे गुन्हा दाखल ; चार आरोपी फरार ..
[ कुंटुर प्रतिनिधी – बालाजी हनमंते कुंटुरकर ]
कुंटुर पोलीस स्टेशन अंतर्गत मौजे राहेर येथील श्री दत्त मंदिर म्हणून प्रसिद्ध असलेल्या महानुभाव पंथ मंदिरांतील पुजारीन यांची हुस्सा येथील आरोपी शरद हंबर्डे, रमेश हंबर्डे, किशोर हंबर्डे, शिवाजी हंबर्डे या चार आरोपींनी छेडछाड केली म्हणून फिर्यादी पिडीत महिलेने कुंटुर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.
पोलीस स्टेशन कुंटुर अंतर्गत येणाऱ्या राहेर येथील श्री दत्त मंदिर म्हणून प्रसिद्ध व नावलौकिक असलेल्या या मंदिरातील जोगिन व पुजारी म्हणून काम करणाऱ्या, देवदासी असणाऱ्या महिला रात्री आपल्या खोलीमध्ये झोपले असता रात्री साडे अकरा ते बारा च्या दरम्यान हुस्सा येथील चार जणांनी येऊन दरवाज्यावर लाथा-बुक्या घालून फिर्यादी पिडीत महिलेस उठवले व तिच्या रूम मध्ये जाऊन तिला “हे दोघे कोण आहेत? त्यांना घेऊन का झोपलीस? असे म्हणून तिला व तिच्या समोर झोपलेल्या मावस भावाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, फिर्यादी महिलेचे ब्लाऊज फाडले व तिला जमिनीवर पाडले, लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून तिची छेडछाड केली, अश्लील शिवीगाळ केली असता त्या पिडीत महिलेने उशिरा कुंटुर पोलीस स्टेशन गाठून या चार आरोपीं विरूद्ध तक्रार दाखल केली आहे.
कुंटुर पोलिस स्टेशनचे कर्तव्यतत्पर सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरी यांनी या तक्रारीची गांभीर्याने दखल घेत – 169/21, 354, 354(अ), 294, 323, 506, 34, भा.दं.वी नुसार गुन्हा दाखल केला असून चार आरोपी सध्या फरार आहेत.
सदर महिला ही पुजारी आहे. राहेर येथे गोदावरी नदीच्या काठावर वसलेले श्री दत्त मंदिर म्हणून प्रसिद्ध असलेल्या महानुभाव पंथ मंदिरांतील ही घटना आहे.
येथील परिसरामध्ये ही घटना पहिल्यांदाच घडल्यामुळे देवस्थानातील पुजारीही सुरक्षित नसल्यामुळे परिसरात एक भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. राहेर देवस्थान मंदिर परिसराचा नावलौकिक असून सदर घटनेमुळे मंदिराची प्रतिमा मलीन झाल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे.
“राहेर हे देवांचे माहेर म्हणून प्रसिद्ध आहे”. श्री दत्त मंदिर हे गोदावरी नदी काठा वर बसलेले आहे. श्री लक्ष्मी नरसिंह मंदिर व श्री दत्त मंदिर महानुभाव पंथाचे श्री चक्रधर स्वामी यांची समाधी स्थळ आहे. येथे जोगिन म्हणून महिला पुजारी आठ ते दहा पुजारिन काम करत असतात. सदरील घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अटकोरे हे करत आहेत.

ताज्या बातम्या