पानसरे महाविद्यालय अर्जापूर येथे जागतिक महिला दिनानिमित्त महिला गौरव पुरस्कार सोहळ्या संपन्न !

[ कुंडलवाडी प्रतिनिधी – अमरनाथ कांबळे ]
            येथून 3 किमी अंतरावर असलेल्या मौजे अर्जापुर येथील पानसरे महाविद्यालय येथे दिनांक 11 मार्च रोजी IQAC विभागाच्या वतीने जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.

 पानसरे महाविद्यालयाने प्रथमच महिला गौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले, यावेळी महाविद्यालयाच्या वतीने हुतात्मा पानसरे हायस्कूल धर्माबाद येथील उपक्रमाशील सहशिक्षिका तथा सामाजिक कार्यकर्ता सौ. मीना गंगाधरराव कलदूर्कीकर, विद्यानिकेतन उच्च महाविद्यालय बिलोली येथील प्राचार्या सौ. स्वाती सुनील एंबडवार, यशवंतराव चव्हाण हायस्कूल बिलोली येथील मुख्याध्यापिका सौ. संगीता राजेश गंगमवार, कै. गंगाबाई पोतन्ना सब्बनवार मुलींचे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कुंडलवाडी येथील सहशिक्षिका सौ. वर्षाताई बाबुराव एनगे आदी महिलांचा गौरव करण्यात आला.
         यावेळी संस्थेचे संचालक प्रकाश पाटील अर्जुने, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.ए. आर. सय्यद,उपप्राचार्य तथा IQAC विभागाचे समन्वयक डॉ. गोविंद चौधरी, कार्यालयीन अधिक्षक,राजेश्वर लाभशेटवार, प्राध्यापक डॉ. एम.बी.बेलखेडे, डॉ.आर.जे गायकवाड, डॉ. सिद्धोधन कांबळे, डॉ. गोपाळ चौधरी, प्रा. हनुमंत मटके यासह अनेक प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी , विद्यार्थी, विद्यार्थिनीं उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. अंजली कदम व कु. नक्षत्रा गाजेवार यांनी तर आभार प्रा. गोदावरी ईरबतनवाड यांनी केले.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या