लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयात जागतिक महिला दिन साजरा !

( गोविंद बिरकुरे ) धर्माबाद येथील लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मंचावर धर्माबाद नगर परिषदेच्या मुख्याधिकारी नीलमताई कांबळे, पोलीस उपनिरीक्षक अनिसा सय्यद, प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉ. स्वाती टोंगे, धर्माबाद नगरीच्या माजी नगराध्यक्षा सौ.शारदा भुपलवार यांची उपस्थित होत्या.
सर्व प्रमुख मान्यवरांनी आपल्या कार्यक्षेत्रातील अनुभव आणि स्त्रीजीवन व कार्य यावर प्रकाश टाकला. तसेच आजच्या युगात महिलांचे योगदान याबद्दल सविस्तर मार्गदर्शन व अनुभव कथन करताना स्त्रीयांच्या भावनिक, मानसिक, शारीरिक व भावनिक विषयावर प्रकाश टाकला.
सुरुवातीला कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. प्रतिभा येरेकार यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्या डॉ. पि. सुशीला यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. बालाजी श्रीगीरे तर आभार रा.से.यो. कार्यक्रमाधिकारी प्रा संभाजी मनूरकर यांनी केले.
यावेळी महाविद्यालयाचे उप-प्राचार्य डॉ श्रीराम गव्हाणे, उप-प्राचार्या वसुंधरा वडवळकर, यिन जलसंपदामंत्री तथा नांदेड जिल्हा पालकमंत्री संतोष साखरे, महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

ताज्या बातम्या