न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस आणि कॉमर्स कॉलेज, रावढळ येथे महिला दिनानिमित्त सप्ताह सोहळा संपन्न !

[ रायगड म्हसळा प्रतिनिधी – प्रा.अंगद कांबळे ]
दि.१२ मार्च २०२२ रोजी रावढळ हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे जागतिक महिला दिनानिमित्त सप्ताह सोहळा आयोजित करण्यात आला होता. ह्या सप्ताहात वेगवेगळ्या विषयावर वेगवेगळे मान्यवरांनी विद्यार्थाना मार्गदर्शन केले. संपूर्ण सप्ताहा भर वेगवेगळ्या स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. 

आज ह्या सोहळ्याचा शेवटचा दिवस महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री मा.यशवंतराव चव्हाण यांच्या जयंती निमित्त स्मृतिस अभिवादन करुन या कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे सौ.अमृता वाघमारे(समाजसेविका), कु.लिना कांबळे जनसंपर्क अधिकारी, (बार्टी) महाड, सौ.योजना लोखंडे, विद्या कांबळे (अंगणवाडी सेविका) व मुख्याद्यापक धर्मरक्षी सर, ह्या महिला दिनानिमित्त आज सौ.अमृता वाघमारे यांनी स्री-पुरूष समानता या विषयावर विद्यार्थाना मार्गदर्शन केले तर दुसर्या प्रमुख पाहुण्या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक, (बार्टी)महाडचे जनसंपर्क अधिकारी लिना कांबळे यांनी बार्टी व राष्ट्रीय स्मारकात असणार्या सोई-सुविधा व शासकीय योजना़ची माहिती यावर विद्यार्थीनीशी संवाद साधून मार्गदर्शन केले.
अंगणवाडी सेविका सौ.योजना लोखंडे तसेच सौ.विद्या कांबळे यांनी किशोरवयीन मुलीसाठी मार्गदर्शन केले या कार्यक्रमासाठी वरील प्रमुख पाहुणे उपस्थितीत होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन श्री दवंडे सर यांनी केले, प्राचार्य धर्मरक्षी सर, शेळके सर, पोरे सर, मुल्ला सर, कुंभार सर, मेंडके सर, सातपुते सर हे उपस्थित होते.कार्यक्रमाचे आभार सौ.रेशीम मॅडम यांनी मानले व कार्यक्रमाची सांगता झाली.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या