जागतिक महिला दिनानिमित आयोजित केलेल्या निबंध व वक्तृत्व स्पर्धेत सौ.निता सुभाष दरबस्तेवार सर्वप्रथम !

[ कुंडलवाडी – जयवर्धन भोसीकर ]
जिल्हा परिषद शिक्षण विभाग नांदेड यांच्या आदेशान्वये बिलोली पंचायत समिती तर्फे जागतिक महिला दिनानिमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत व वक्तृत्व स्पर्धेत कुंडलवाडी केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिरली येथे सहशिक्षिका या पदावर कार्यरत असलेल्या सौ.निता सुभाष दरबस्तेवार (दमकोंडवार) या सर्वप्रथम आलेल्या आहेत.
त्यांना नुकतेच पंचायत समिती बिलोली तर्फे एका कार्यक्रमात पारितोषिक देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. याबाबत सविस्तर माहिती अशी की, जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा परिषद शिक्षण विभाग नांदेड यांच्या आदेशान्वये बिलोली पंचायत समिती कडून तालुक्यातील प्रत्येक केंद्रस्तरावर सर्व महिला शिक्षकांची निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आणि रांगोळी स्पर्धा घेण्यात आले होते.
या निबंध स्पर्धेत सर्वप्रथम सौ.निता सुभाष दरबस्तेवार (दमकोंडवार), द्वितीय सौ.जे.एम.पाटील तर वक्तृत्व स्पर्धेत सर्वप्रथम सौ.निता सुभाष दरबस्तेवार (दमकोंडवार), तर द्वितीय सौ.शिवकन्या पटवे आणि रांगोळी स्पर्धेत सर्वप्रथम सौ.शिवकन्या पटवे तर द्वितीय सौ.जे.एम. पाटील या आलेल्या आहेत.
वरील सर्व स्पर्धेचे परीक्षक म्हणून सब्बनवार प्राथमिक शाळेतील सहशिक्षिका सौ.सारिका मद्दलवार यांनी काम पाहिले. या सर्व यशस्वी महिला शिक्षिकांना नुकतेच बिलोली पंचायत समितीतर्फे एका समारंभात पारितोषिके प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
या सर्व यशस्वी महिला शिक्षिकांचे गटशिक्षणाधिकारी जी.एस.तोटरे, शिक्षण विस्तार अधिकारी सौ.भैरवाड मॅडम, केंद्रीय मुख्याध्यापक वाघमारे सर यांच्यासह कुंडलवाडी केंद्रातील सर्व शिक्षक वृंद यांनी अभिनंदन व कौतुक केले आहे.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या