जागतिक महिला दिन नायगांवात मोठ्या उत्साहानं साजरा !

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व नावलौकिक मिळवलेल्या महीलांचा मातृछाया जनसेवा फाउंडेशन महाराष्ट्र राज्य च्या वतीने पोलीस स्टेशन नायगांव (बा) येथील कर्तव्यदक्ष भुमिका बजावत असलेल्या महिला पोलिस भगिंनी व शासकीय ग्रामीण रुग्णालय नायगांव (बा) येथील उल्लेखनीय भुमिका बजावत असलेल्या डॉक्टर भगिनी,  परीचारिका भगिनी तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिला मान्यवरांचा सामाजिक कार्यकर्त्या- ममता ताई भद्रे, फाऊंडेशनचे मराठवाडा अध्यक्ष शिवानंद पांचाळ नायगांवकर, मराठवाडा उपाध्यक्ष राजेंद्र भाऊ कांबळे, मराठवाडा संपर्क प्रमुख राजू भाऊ भद्रे, पञकार शिवाजी कुंटूरकर यांच्या सह आदी उपस्थितांच्या हस्ते सन्मानपञ देवून सत्कार- गौरव करण्यात आला.

यावेळी अजय सोनकांबळे, राजू कांबळे, तुकाराम बोगरे, सिध्दार्थ भद्रे यांच्या सह विविध क्षेत्रातील कार्यकर्ते बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ताज्या बातम्या