जिवणात यशस्वी होण्यासाठी महीलांनी भारतीय संविधानातील आपल्या अधिकाराचा लाभ घेऊन यशस्वी व्हावे असे आवाहन बिलोली तालुका समतादुत श्रीमती शारदा माळे यांनी चिंचाळा येथे महीलांना संबोधताना केले.
दिनांक 8 मार्च रोजी बार्टी च्या वतीने जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ.मणीषा डाकेवाड होत्या तर प्रमुख वक्ते म्हणुन समतादुत श्रीमती शारदा माळे तर अतीथी डाॅ.संतोष चव्हाण, कृषी मंडळ अधीकारी मरेवाड, कृषि सहाय्यक मादळे, डि.व्ही सुर्यवंशी, एस.आर स्वामी, मुख्याद्यापक सौ.चौधरी, सौ.जळपतराव, अणिता कमंलवाड, बॅंक सखी छाया सोनकांबळे, आशा वर्कर भाग्यश्री वाघमारे, सी आर पि नंदाबाई पांडन, ग्रामसंघ अध्यक्ष लक्ष्मी हुस्सेकर आदी उपस्थित होते. सुत्रसंचलन मारोती जाधव तर आभार शैलेश पाटील यांनी मानले.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. If you continue to use this site we will assume that you are happy with it.AcceptPrivacy policy