नारीशक्ती ही रत्नाची खाण असून ती दुर्गेची रूप आहे – भगवताचार्य रामचंद्र महाराज सुकीकर !

[ नायगाव बा.ता. प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
नारीशक्ती ही रत्नाची खाण असून ती दुर्गेची रूप आहे म्हणून प्रत्येकाने नारी शक्तीचा आदर केलापाहिजे तसेच प्रत्येकाना जीवनात सुखी जगावे असे तर प्रत्येकाने व्यसनापासून दूर राहा व आपला समाज सुधरावयाचा असेल तर अंधश्रद्धा दूर केली पाहिजे असे मत भगवताचार्य रामचंद्र महाराज सुकीकर यांनी पुरातन कालीन जागृत देवस्थान समजले जाणारे शिवपार्वती यांनी वास्तव्य केलेला महादेवाचे स्थान असलेल्या केदारवडगाव येथील श्रीमद् भागवत ज्ञान कथा सोहळ्यात आपले विचार व्यक्त केले.

नायगाव तालुक्यातील भाविकांचे श्रद्धास्थान समजले जाणाऱ्या पुरातन कालीन जागृत देवस्थान असलेल्या केदारनाथ येथून पृथ्वीवरून भ्रमण करीत असताना शिवपार्वती यांनी केदारवडगाव येथे वास्तव केले कथा साधुसंताच्या तोंडून ऐकावयास मिळते दरवर्षीप्रमाणे केदारवडगाव मंदिर येथे या वर्षी सुद्धा गावकऱ्यांच्या वतीने शिवरात्रीचा महिना असल्यामुळे या महिन्यात शिवाची पूजाअर्चा केल्याने मोठे सुख प्राप्त होते म्हणून अनन्यसाधारण महत्त्व आहे श्रीमद् भागवत ज्ञान कथा सोहळा सुरुवात दिनांक 16 फेब्रुवारी 2024 ते 23 फेब्रुवारी 2024 पर्यंत विविध कार्यक्रमाचे सुरुवात झाली असून काकड आरती, भगवंताची पूजा अर्चा महाआरती महाप्रसाद, गाथा भजन ,ज्ञानेश्वरी पारायण, श्रीमद् भागवत कथा आधी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले.

 या कार्यक्रमात भगवताचार्य महाराज सुकीकर यांच्या संगीतमय सुश्राव्य वाणीतून भाविकांना मंत्रमुग्ध श्रीमद् भागवत कथा ऐकावयास मिळत असल्याने महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते आचार्य रामचंद्र महाराज सुकीकर यांनी संत महिमा भाग क्रमांक एक व भाग क्रमांक दोन असे ग्रंथ लिहिले असून संत महंत गोविंदगिरी महाराजाचे शिष्य ते आहेत.

www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या