मराठीतच कामकाज झाले पाहिजे – प्रा.मोहसीन खान

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
दि.२७ फेब्रुवारी२०२२ रविवारी बिलोली आगाराच्या वतीने कोरोना नियमांचे पालन करित छोटेखानी मराठी गौरव दिन साजरा करण्यात आले. मराठी राजभाषा गौरव दिन व कवी, लेखक, साहित्यिक वि.वा.शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त सुरुवातीला वि.वा.शिरवाडकर यांच्या प्रतिमेस ज्येष्ठ पत्रकार ए.जी.कुरेशी व सय्यद रियाज या दोघांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.
आजच्या आधुनिक काळात व सतत वाढणाऱ्या स्पर्धेत शालेय विद्यार्थ्यांसह सर्वांनाच जशी ईंग्रजी भाषा लिहता, वाचता, बोलता येणे आवश्यक आहे तश्याच पध्दतीने आपण महाराष्ट्रातील सर्व नागरिक व मराठी भाषेवर प्रेम करणा-यांनी मराठी भाषेसाठी, मराठी शाळेसाठी त्याच्या संवर्धनासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. आज सर्वच शासकिय कार्यालयात मराठी भाषेमध्येच कामकाज झाले पाहिजे असे मत अल ईम्रान प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.मोहसीन खान यांनी व्यक्त केले.
यावेळी आगारप्रमुख च.रा.समर्थवाड, वाहतुक निरिक्षक ओ.शि.ईंगोले, प्रमुख कारागिर सं.ल.भंडारे, लिपिक एम.टी.फारुखी, रा.अ.कदम, व्हि.आर.कोलंबरे, आर.एस.चीलकेवार, नियंञक एस.एन.बैस, व्हि.एन.अनमोड, कारागिर मि.ता.बेग, द.को.बोळसेकर, स.वि.सुरनरे, चालक गायकवाड कामाजी भुंजग आगारातील आदी कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या