कष्टकरी संघटनेची नायगाव येथे बैठक संपन्न !

दगड फोडतो आम्ही,डोंगर फोडतो आम्ही,रक्ताच्या सिमेंटानं धरण बांधतो आम्ही, सुख तुम्हाला दुःख आम्हाला, हे क्रांतिकारी गीत कॉम्रेड देवराव आईलवार यांनी सादर करुन सर्वांचे लक्ष वेधले.
[ नायगाव बा. ता.प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
आंध्र प्रदेश मधील जिल्हा खमंग येथे आगामी राष्ट्रीय अधिवेशन होणार असून या अनुषंगाने कष्टकरी संघटनेची बैठक नायगाव शहरात नुकतेच संपन्न झाली असून या बैठकीत सविस्तर मार्गदर्शन मजदूर संघटनेचे राष्ट्रीय सचिव कॉम्रेड प्रवीण नाडकर, राज्य सचिव अँड अरविंद देशपांडे, कष्टकरी संघटनेचे नेते देवराव आईलवार,प्रा.प्रकाश हिवराळे,प्रा. हनमंत हांडे यांनी केले आहे.
  कष्टकऱ्यांचे जीवन म्हणजेच एक समस्या बनली आहे म्हणून कष्टकरी वर्गाची उद्याचं भवित्व आणि देशातील भाजपा सरकारची शेतकरी कष्टकरी लोकाविषयी नाकर्तेपणा असून या सरकारला लोकशाही प्रजासत्ताक नको तर भांडवलशाही हवी आहे म्हणून उद्याची विधानसभा व लोकसभेची दिशा ठरविण्यासाठी नायगाव शहरात कष्टकरी संघटनेची नुकतीच बैठक पार पडली आहे. यावेळी अँड बी एम वाघमारे, डॉ .प्रभाकर गायकवाड,गणपत रेड्डी ,रामदास कांबळे,एम के बैलकवाड, माधव ऐंजपवाड, आनंदा पाटील शहापुरे, शाहीर साहेबराव सुर्यकार कैलास वाघमारे, गंगाधर वाघमारे, लक्ष्मण सूर्यकार, बाबू देवाले,डुमणे यासह अनेकांची यावेळी उपस्थिती होती.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या