DAY-NULM अंतर्गत लिंग आधारित भेदभाव आणि हिंसा यावर नगरपरिषद उमरी येथे कार्यशाळा संपन्न !

[ नांदेड जिल्हा प्रतिनिधी – आनंद सुर्यवंशी ]
दिनदयाळ अंत्योदय योजना- राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान DAY-NULM उमरी नगरपरिषद अंतर्गत “नयी चेतना;पहल बदल ली” नावाची लिंग आधारित भेदभाव दुर करण्यासाठी मा.मुख्याधिकारी गणेश चाटे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
 सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन डॉ.दिव्या भारती, डॉ.सलमा सय्यद, श्री.ठोकरे ग्रामीण रुग्णालय उमरी व मुख्याधिकारी श्री.गणेश चाटे यांनी महिलांना सखोल असे मार्गदर्शन केले. तसेच सर्वानुमते लिंगभाव समानता प्रतिज्ञा घेण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यालयीन अधिक्षक गणेश मदने यांनी केले तर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री.गायकवाड पी.एम. (स.प्र.अ.) ,सचिन गंगासागरे,रमाबाई करपे,संगिता हेमके,चेंदकांत श्रीकांबळे, गौतम सोनफले गंगाधर पवार,माधव जाधव, श्री.नरेंद्र खंदारे (स.सं.) DAY-NULM यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी या परिश्रम घेतले आहे.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या